Amrutsagar Milk Union award: ‘अमृतसागर’ला ग्रीन वर्ल्ड को-प्राईड पुरस्काराने गौरव

सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते दूध संघाचा सन्मान
Amrutsagar Milk Union award
Amrutsagar Milk Union awardPudhari
Published on
Updated on

अकोले : तालुक्याची कामधेनू असलेल्या अमृतसागर सहकारी दूध व्यावसायिक व प्रक्रिया संघास सहकार क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीबद्दल ग्रीन वर्ल्ड को-प्राईड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहेत. ग्रीनवर्ल्ड, लीड जि डब्लू फौंडेशन, कॉसमॉस को- ऑप.बँक यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक सहकार दिनाचे औचित्य साधून आयोजित ‌‘सहकार मंथन‌’ या कार्यक्रमामध्ये सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, ग्रीन वर्ल्डचे अध्यक्ष गौतम कोतवाल, कॉसमॉस को ऑप बँकेचे अध्यक्ष प्रल्हाद कोकरे आदी मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Amrutsagar Milk Union award
Rahuri Assembly by-election: ‘राहुरी‌’ची चर्चा कर्डिले, तनपुरे, विखेंभोवती!

हा पुरस्कार अमृतसागर दूध संघाचे अध्यक्ष माजी आमदार वैभव पिचड, उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे, संचालक आनंदराव वाकचौरे, गोरक्ष मालुंजकर, शरद चौधरी, अप्पासाहेब आवारी, रामदास आंबरे, जगन देशमुख, अरुण गायकर, गंगाधर नाईकवाडी, सुभाष डोंगरे, बाबुराव बेनके, शिवाजी गायकर, अश्विनी धुमाळ, सुलोचना औटी, तज्ज्ञ संचालक दयानंद वैद्य, बाळासाहेब मुंढे, जनरल मॅनेजर दादाभाऊ सावंत यांनी स्वीकारला.

Amrutsagar Milk Union award
Rahuri Women Harassment Case: राहुरीत विवाहितेला विष पाजण्याचा प्रयत्न; मानोरीत गोळ्या घालण्याची धमकी देत विनयभंग

सामूहिक यश : पिचड

अमृतसागर दूध संघाने नेहमीच दूध उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन अनेक धोरणात्मक निर्णय घेतलेले आहे. सामाजिक जाणिवेतून शेतकऱ्यांच्या संकटकाळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो आहोत. सहकार क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देऊन उत्कृष्ट कामगिरी केली. या उत्कृष्ट कामगिरीमध्ये सर्व दूध उत्पादक शेतकरी, डेअरी, सर्व संचालक,सदस्य, सभासद व अधिकारी, कर्मचारी यांचे मोठे सहकार्य लाभल्याची भावना दूध संघाचे अध्यक्ष माजी आमदार वैभव पिचड यांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news