Akole LPG Cylinder Misuse: अकोलेत घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर उघड; पुरवठा विभागाची हॉटेलांवर कारवाई

35 हॉटेल-रेस्टॉरंटची तपासणी; 7 घरगुती एलपीजी सिलेंडर जप्त, नियमभंग करणाऱ्यांना इशारा
Akole LPG Cylinder Misuse
Akole LPG Cylinder MisusePudhari
Published on
Updated on

अकोले: शहरासह परिसरात घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक कारणांसाठी मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याचे चित्र समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर अकोले शहरात पुरवठा विभागाने 35 हॉटेल-रेस्टॉरंटची तपासणी करुन 7 घरगुती गॅस सिलेंडर जप्त करत कारवाई केली आहे.

Akole LPG Cylinder Misuse
Parner POCSO Case: पारनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; कीर्तनकार यशवंत थोरात अटकेत

शहरातील अनेक हॉटेल, चहाच्या टपऱ्या, नाश्ता सेंटरमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरऐवजी घरगुती वापराचे सिलिंडर सर्रास वापरले जात असल्याचे दिसून येते. शासनाकडून घरगुती गॅस सिलिंडरवर अनुदान दिले जात असल्यामुळे त्याचा व्यावसायिक वापर करणे नियमबाह्य मानले जाते. तरीही घरगुती सिलिंडरचा वापर केला जात आहे. या संदर्भात यंत्रणेकडून कारवाई होत नसल्याने हे प्रकार वाढले आहेत. दरम्यान, सध्या जिल्हा पुरवठा विभागाने गॅस सिलिंडरचा तुटवडा नसल्याचे स्पष्ट केले आहे. तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा अधिकारी संदीप निळे, पुरवठा निरीक्षक अधिकारी राम जाधव यांनी शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट व ढाब्यांवर विशेष तपासणी मोहीम राबविली. या मोहिमेत शहरातील एकूण 35 हॉटेल, रेस्टॉरंट व ढाब्यांची तपासणी करण्यात आली.

Akole LPG Cylinder Misuse
Rahuri By Election: भाजप प्रवेशाच्या चर्चांवर प्राजक्त तनपुरेंचे स्पष्टीकरण; राहुरी पोटनिवडणुकीबाबत सस्पेन्स कायम

वाहनांमध्येही घरगुती गॅस सिलिंडरचा वापर

कोतूळ, अकोले शहरात काही वाहनांमध्येही घरगुती गॅस सिलिंडरचा वापर केला जात असल्याचे दिसून येत आहे. काही प्रवासी वाहतूक करणारे ऑटो, ओमनी, तसेच काही कारमध्ये अवैधरीत्या घरगुती गॅस सिलिंडरमधून गॅस भरला जात असल्याची माहिती समोर येत आहे. मशीनच्या साहाय्याने वाहनांमध्ये घरगुती गॅस भरून देणारे काही लोक शहरात कार्यरत असल्याचे सांगितले जाते.

जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या आदेशानुसार तसेच तहसीलदार महेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा नायब तहसीलदार अमोल फोपसे व त्यांच्या टीमने शहरातील विविध ठिकाणी छोटे, मोठे हॉटेल, रेस्टॉरंट, चायनीज सेंटर, धाबे व चहा टपऱ्यांवर धडक तपासणी मोहीम राबवली. त्यात एचपी, भारत व इंडेन कंपनीच्या 19 घरगुती गॅस टाक्या अवैधरित्या वापर करताना आढळून आल्या. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात आली अशी माहिती तालुका पुरवठा अधिकारी अमोल फोपसे यांनी दिली.

Akole LPG Cylinder Misuse
Ahilyanagar Women Bike Rally: अहिल्यानगरमध्ये ‘पुढारी-कस्तुरी क्लब’ची भव्य महिला बाईक रॅली; पारंपरिक वेशभूषेत रणरागिणींचा जल्लोष

इराण इस्राईल, अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 चे कलम 3 व 7 अन्वये व्यावसायिक आस्थापनांमध्ये घरगुती गॅस सिलेंडर वापरण्यास स्पष्ट मनाई आहे. तरीही अनेकांनी हा नियम धाब्यावर बसवल्याचे आढळून आले. व्यावसायिकांनी केवळ 19 किलो वजनाचे निळे व्यावसायिक सिलेंडरच वापरावेत. घरगुती गॅसचा वापर करणे हा कायद्याचा भंग असून, कठोर फौजदारी व दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे अमोल फोपसे यांनी सांगितले. दरम्यान, कालच्या छापेमारीत पुरवठा निरीक्षक आदिती भालेराव, पुरवठा सहाय्यक गणेश गरुड, नीलेश चौधरी, रजनी पावरा यांचा समावेश होता. घरगुती गॅसचा गैरवापर थांबविला नाही, तर पुढील कारवाई अतिशय कठोर असेल, असे पुरवठा अधिकारी फोपसे म्हणाले.

शहर परिसरातील जप्त केलेल्या टाक्यांमध्ये येवला रोड भागातील हॉटेल जगदंबा ताराचंद परदेशी दोन टाक्या, सावजी फॅमिली रेस्टॉरंट वीरा पॅलेस जवळ एक, साई सिटी भागातील मामाज रेस्टॉरंट अमरनाथ अरोरा दोन, लोकसेवा इंजीनियरिंग वर्क्स नासिर अत्तार दोन, तृप्ती भोजनालय सारंगधर एक, साई सुगरण सुभद्रा देशमुख एक, व अन्य दोन यांच्यावर कारवाई करण्यात येऊन 19 टाक्या जप्त केल्या आहेत, असे फोपसे यांनी सांगितले. याबाबतची आता पुढील सुनावणी जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांच्यापुढे होणार आहे. ही कारवाई यापुढेही शहरात सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Akole LPG Cylinder Misuse
Tamarind Farmers Income: नगर तालुक्यात चिंचेचा आधार; बांधावरील झाडांमुळे शेतकऱ्यांना दिलासा

अकोले शहरात 35 हॉटेल, रेस्टॉरंट व ढाब्यांची तपासणी करण्यात येत असताना काही ठिकाणी घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर होत असल्याचे आढळून आले. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे पुरवठा विभागाने 7 घरगुती एलपीजी सिलेंडर जप्त करुन कारवाई केली. तसेच हॉटेल, रेस्टॉरंट व ढाबा चालकांनी व्यावसायिक वापरासाठी घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करू नये, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल.

डॉ. सिध्दार्थ मोरे, तहसीलदार, अकोले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news