Shrirampur Crime: आकाश दुबैय्या हत्या प्रकरण: अफवांवर विश्वास ठेवू नका; एसपी मुम्मका सुदर्शन यांचे आवाहन

श्रीरामपूरात व्यापारी-नागरिकांसाठी 'सुसंवाद बैठक'; तक्रार निवारण केंद्र सुरू करण्याची घोषणा, सुजय विखेंची कृतीतून उत्तर देण्याची भूमिका
New SP Ahilyanagar
New SP AhilyanagarPudhari
Published on
Updated on

श्रीरामपूर: आकाश दुबैय्या हत्येनंतर सोशल मीडिया व अन्य प्रकारे अफवा पसरविल्या जात आहेत. पोलिसांच्या कार्यपद्धतीवर अविश्वास दाखविला जात आहे. ते चुकीचे असून पोलिसांची कारवाई सुरू असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी केले. शहर पोलिस ठाण्यात दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. व्यापारी तसेच नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी शनिवारी (दि, १८) सुसंवाद बैठक आयोजित केल्याची माहितीही त्यांनी दिली. अप्पर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपअधीक्षक जयदत्त भवर, निरीक्षक विशाल खैरे व अरुण नलावडे आदी उपस्थित होते.

New SP Ahilyanagar
District Bank Election: जिल्हा बँक निवडणुकीसाठी राम शिंदेंची मोर्चेबांधणी; दिग्गज नेत्यांच्या भेटींनी राजकीय समीकरणांना वेग

श्रीरामपूर शहर व तालुका पोलिस ठाण्याच्या वतीने व्यापारी, उद्योजकांशी सुसवाद बैठक शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता आयोजित करण्यात आली आहे. व्यापारी मंगल कार्यालयात होणाऱ्या याबैठकीत शहरवासीयांना पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्याशी थेट संवाद साधता येणार आहे. सर्व व्यापाऱ्यांनी या सुसंवाद बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे, असे सुदर्शन यांनी या वेळी सांगितले.

New SP Ahilyanagar
Akole Free Textbooks: दोन महिने उलटले, विद्यार्थी पाठ्यपुस्तकांपासून वंचित

यापूर्वी कोणी ऐकल्या असतील, नसतील; दाखल झाल्या असतील वा नसतील, कारवाई झाली असेल-नसेल अशा सर्व तक्रारी नागरिकांनी या बैठकीत मांडाव्यात. पोलिस व नागरिकांतील दुरावा कमी होऊन संवाद वाढावा, यासाठी हा संवाद पुढील काळातही सातत्याने सुरू राहणार आहे. याची सुरुवात जिल्ह्यात श्रीरामपूर येथून केली जात असल्याचे मुम्मका सुदर्शन म्हणाले.

New SP Ahilyanagar
Shrirampur Crime: श्रीरामपुरातून ९६ हजारांचे मेफेड्रोन जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, एकास अटक

तक्रार निवारण केंद्र सुरू करणार

नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी श्रीरामपूर पोलिस ठाण्यात किंवा अन्य ठिकाणी तक्रार निवारण केंद्रही सुरू केले जाणार आहे. तेथे थेट तक्रार दाखल करून घेण्यात येईल. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात येऊन गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती सुदर्शन यांनी दिली.

New SP Ahilyanagar
Sant Vamanbhau Palkhi: चला पंढरीशी जाऊ... संत वामनभाऊ महाराज पालखी सोहळा; जामखेडला पहिले रिंगण...

मी याबाबत आताच काही बोलणार नाही, मला स्वतःच लक्ष घालावे लागणार आहे. मी कृतीतून करून दाखवेन आणि नंतर बोलेन,’ असे माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी सांगितले.

डॉ. विखे यांनी शुक्रवारी सायंकाळी आकाश दुबैय्या यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. या हत्येबाबत अनेक नेत्यांनी मते व्यक्त केली आहेत. याबाबत आता मी अधिक काय बोलणार? मी कृती करणारा माणूस आहे आणि कृतीतूनच मी बोलेन, असे डॉ. विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news