Leopard Human Conflict: कामरगावमध्ये बिबट-मानव संघर्ष रोखण्यासाठी ‘एआय वाईल्ड नेत्र’ सायरन कार्यान्वित

बिबट्याचा वावर ओळखताच तत्काळ इशारा; अहिल्यानगर वनविभागाचा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
Leopard Human Conflict
Leopard Human ConflictPudhari
Published on
Updated on

नगर: बिबटप्रवण क्षेत्रात वन्य प्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी व मानवाशी होणारा संघर्ष टाळण्यासाठी वनविभागातर्फे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून कामरगाव (ता. अहिल्यानगर) येथे वनविभागातर्फे ‌‘एआय वाईल्ड नेत्र‌’ ही सौरऊर्जेवर चालणारी अत्याधुनिक सायरन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या यंत्रणेमुळे बिबट्याचा वावर लक्षात येताच गावकऱ्यांना तत्काळ सावध करणे शक्य होणार आहे.

Leopard Human Conflict
Rahuri Power Theft: राहुरीत वीजचोरीचा धक्कादायक प्रकार; पारस डेअरीवर २५ लाखांचे देयक, गुन्हा दाखल

वनपरिक्षेत्र कार्यालय, अहिल्यानगर अंतर्गत येणाऱ्या मौजे कामरगाव येथे 23 डिसेंबर रोजी ही यंत्रणा बसविण्यात आली. या यंत्रणेत ‌‘ॲडव्हान्स कॅम्प्युटर व्हिजन‌’ व ‌‘डीप लर्निंग‌’ या प्रगत तंत्रज्ञानाचा समावेश आहे. बिबट या वन्यप्राण्याचा डेटाबेस या उपकरणात जतन करण्यात आला आहे. त्यामुळे कॅमेऱ्यासमोर बिबट्या आल्यास ही यंत्रणा तत्काळ ॲक्टिव्हेट होऊन सायरनद्वारे नागरिकांना धोक्याचा इशारा देते. यामुळे नागरिकांना सतर्क राहून आवश्यक त्या उपाययोजना करणे सोपे होणार आहे. विशेष म्हणजे हे तंत्रज्ञान कोणत्याही मोबाईल नेटवर्कशिवाय काम करते.

Leopard Human Conflict
Mahayuti Seat Sharing: महायुती निश्चित; पण जागावाटपाचा गुंता वाढतोय, केडगावच्या राजकारणाला कलाटणी

बिबट-मानव संघर्ष टाळण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा वार्षिक योजनेतून वनविभागास तातडीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून प्रायोगिक तत्त्वावर ही यंत्रणा उभारण्यात आली आहे. उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांच्या मार्गदर्शनाखाली कामरगाव येथील मुरलीनगर व खंडोबा मंदिर परिसरात हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला. या प्रणालीमुळे केवळ सायरन वाजत नाही, तर बिबट्यांच्या वर्तवणुकीचा अचूक डेटाही वनविभागाला उपलब्ध होणार आहे. बिबट-मानव संघर्ष व्यवस्थापनात ही ‌‘एआय‌’ आधारित यंत्रणा अत्यंत उपयोगी ठरेल, असा विश्वास सालविठ्ठल यांनी व्यक्त केला आहे.

Leopard Human Conflict
Karjat Solar Project Protest: बेरडीतील आदिवासी शेतजमिनीवर सौर प्रकल्पाला विरोध; कर्जत तहसील कार्यालयाबाहेर तीव्र आंदोलन

पालकमंत्र्यांच्या हस्ते रेस्क्यू वाहनांचे लोकार्पण

दरम्यान, जिल्ह्यातील वाढता बिबट-मानव संघर्ष प्रभावीपणे हाताळण्यासाठी वनविभागास जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या रेस्क्यू वाहनांचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते निळवंडे (ता. अकोले) येथे करण्यात आले. या वाहनांमुळे वनविभागाला घटनास्थळी तातडीने पोहचण्यास मदत होणार आहे.

Leopard Human Conflict
Tishgaon Sugarcane Truck Accident: तिसगाव येथे उसाने भरलेला ट्रक उलटला; महामार्गावर 25 टन उसाचा सडा, वाहतूक कोंडी

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विखे पाटील यांनी सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 14 रेस्क्यू वाहनांना मंजुरी दिली होती. या वाहनांचा पुरवठा सुरू झाला असून, निळवंडे येथे आयोजित कार्यक्रमात अकोले येथील वनक्षेत्रपाल यांना बोलेरो कॅम्पर वाहनाची चावी सुपूर्द करून वाहन प्रदान करण्यात आले. ही वाहने वनविभागाच्या ताफ्यात दाखल झाल्याने बिबट-मानव संघर्षाच्या घटना घडल्यास क्षेत्रीय वन कर्मचाऱ्यांना तत्काळ घटनास्थळी पोहोचून मदतकार्य करणे सुलभ होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news