Ahilyanagr Kopardi Case: कोपर्डी प्रकरण: मृत्युदंडाच्या अपिलावर सुनावणी; उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची घटनास्थळी पाहणी

साक्षीदारांच्या जबाबांतील अंतर, घटनास्थळाची रचना आणि आरोपींच्या हालचालींबाबत घेतली माहिती; कडेकोट पोलिस बंदोबस्त
Bombay High Court
Bombay High CourtPudhari
Published on: 
Updated on: 

कर्जत: कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व हत्येच्या गुन्ह्यात मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींच्या अपिलावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती आशिष चव्हाण यांच्या खंडपीठासमोर सुरू असलेल्या या सुनावणीतील अंतिम युक्तिवादापूर्वी साक्षीदारांच्या जबाबातील अंतर, घटनास्थळाची रचना आणि आरोपींच्या हालचालींबाबत अधिक स्पष्टता मिळवण्याचा न्यायालयाचा प्रयत्न आहे. त्यासाठी दोन्ही न्यायमूर्तींनी शुक्रवारी घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली.

Bombay High Court
Ahilyanagr District Bank Election: जिल्हा बँकेच्या राजकारणात नवे समीकरण; पिचड-गायकर ‘पॅचअप’च्या मार्गावर!

पाहणीवेळी प्रकरणाच्या तपासाशी संबंधित तत्कालीन पोलिस अधिकारी बाजीराव गवारे, तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे तत्कालीन पोलिस निरीक्षक शशिराज पाटोळे उपस्थित होते. त्यांनी न्यायमूर्तींना प्रकरणाच्या तपासाच्या अनुषंगाने घटनास्थळ व घटनाक्रमाची माहिती दिली. यावेळी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय येनपुरे, अहिल्यानगरचे अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर, कर्जतचे पोलिस निरीक्षक हनुमान गायकवाड यांच्यासह पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Bombay High Court
Revenue Canteen Charges: चहा १५ रुपये... खाद्यपदार्थांचे दर अधिक... डबा खाल्ल्यास चार्ज; कोकाटे यांची चौकशीची मागणी

घटनास्थळाची प्राथमिक पाहणी घेतल्यानंतर न्यायमूर्तींनी काही बाबींबाबत अधिक स्पष्टता मिळवण्यासाठी पुन्हा संबंधित परिसराची पाहणी केली. तपास अधिकारी आणि उपस्थित अधिकाऱ्यांकडून घटनाक्रमाची माहिती घेत त्यांनी घटनास्थळावरील विविध ठिकाणांचे परस्परांतील अंतर आणि परिसराची रचना समजून घेतली. पाहणीदरम्यान न्यायमूर्तींनी ग्रामस्थ, नातेवाईक किंवा अन्य व्यक्तींशी स्वतंत्र संवाद साधला नाही. संबंधित न्यायालयीन प्रक्रियेच्या अनुषंगाने त्यांनी तपास अधिकारी, सरकारी पक्षाचे प्रतिनिधी आणि उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांकडूनच माहिती घेतली.

Bombay High Court
Manori Medical Dispute: गोळ्या बदलण्यावरून सुरू झालेला वाद थेट हाणामारीपर्यंत! मानोरीत दोन्ही बाजूंनी गुन्हे दाखल

कडेकोट पोलिस बंदोबस्त

उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रत्यक्ष घटनास्थळी येणार असल्याने कोपर्डी परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अनधिकृत व्यक्तींना घटनास्थळाच्या परिसरात प्रवेश देण्यात आला नाही. माध्यमांच्या प्रतिनिधींनाही पाहणीच्या अनुषंगाने आवश्यक सूचना देण्यात आल्या होत्या.

कोपर्डी... मृत्युदंड आणि अपिलापर्यंत...

कोपर्डी येथे १३ जुलै २०१६ रोजी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. हे प्रकरण समोर आल्यानंतर महाराष्ट्रात तीव्र संताप व्यक्त झाला. या घटनेनंतर राज्यभर मोठ्या प्रमाणावर मोर्चे आणि आंदोलने झाली. पुढे मराठा समाजाच्या राज्यव्यापी मोर्चांच्या मालिकेला या घटनेने महत्त्वाची पार्श्वभूमी मिळाली. या प्रकरणात पोलिसांनी जितेंद्र ऊर्फ पप्पू बाबूलाल शिंदे, संतोष गोरख भावळ आणि नितीन गोपीनाथ भैलुमे यांना आरोपी केले होते. नोव्हेंबर २०१७ मध्ये अहमदनगर (अहिल्यानगर) येथील विशेष न्यायालयाने तिन्ही आरोपींना दोषी ठरवून मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात अपिले दाखल झाली, तसेच मृत्युदंडाच्या पुष्टीकरणासाठी राज्य सरकारकडून स्वतंत्र कार्यवाही करण्यात आली.

Bombay High Court
Sugarcane Crushing Season: ‘यंदा क्षेत्र मोठे, पण उत्पादन कमीच’; पाऊस नाही, उसाची वाढ नाही, उत्पादन घटणार

एका दोषीचा कारागृहात मृत्यू

या प्रकरणातील दोषी जितेंद्र ऊर्फ पप्पू बाबूलाल शिंदे याचा सप्टेंबर २०२३ मध्ये कारागृहात मृत्यू झाला. त्यामुळे त्याच्याविरुद्धची कार्यवाही संपुष्टात आली असून, संतोष भावळ आणि नितीन भैलुमे यांच्या अपिलांवर तसेच मृत्युदंडाच्या पुष्टीकरणासंदर्भातील कार्यवाहीवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

कलम ३१० अंतर्गत स्थानिक पाहणी

फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ३१० अंतर्गत न्यायालयाने ही स्थानिक पाहणी केली. आधीच न्यायालयासमोर नोंदवलेले साक्षी-पुरावे व कागदपत्रे अधिक योग्य पद्धतीने समजून घेणे, हा या पाहणीचा उद्देश आहे. नवीन पुरावा गोळा करण्यासाठी ही पाहणी करण्यात आलेली नसल्याचे न्यायालयाच्या आदेशातून स्पष्ट होते. सरकारी पक्ष तसेच बचाव पक्षाने या पाहणीला आक्षेप घेतला नव्हता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news