Ahilyanagar Municipal Blood Bank: कर्मचाऱ्यांअभावी अहिल्यानगर मनपाची रक्तपेढी दीड महिन्यांपासून बंद

कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयातील लाखो रुपयांची मशिनरी निष्क्रिय; लवकरच रक्तपेढी पूर्ववत करण्याचे आश्वासन
 Municipal Blood Bank
Municipal Blood BankPudhari
Published on
Updated on

डॉ. सूर्यकांत वरकड

नगर: अहिल्यानगरमधील रुग्णांना अल्पदरात रक्त उपलब्ध व्हावे, यासाठी महापालिकेने लाखो रुपये खर्च करून रक्तपेढी सुरू केली. त्यांचा अनेक गरजू रुग्णांना लाभही झाला. वर्षाकाठी सुमारे बाराशे ते तेराशे रक्त पिशव्यांचे तिथे संकलन होत होते. मात्र, कर्मचाऱ्यांअभावी गेल्या दीड महिन्यांपासून रक्तपेढी बंद असून, लाखो रुपयांची मशिनरी धूळखात पडून आहेत.

 Municipal Blood Bank
Jamkhed Crime | जामखेड येथे चाकू-काठीने मारहाण करुन एकाचा खून, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल, एक आरोपी अटकेत

अहिल्यानगर शहरात महापालिकेचा कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात आहे. महिलांच्या प्रसूतीसाठी देशपांडे रुग्णालयाचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. तसेच, मनपाचे चार ते पाच ठिकाणी आरोग्य केंद्रही आहेत. शहरातील नागरिकांना आरोग्य सेवा आणखी सुलभ होण्यासाठी महापालिकेने बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात रक्तपेढी सुरू गेली होती. कोविड काळात रक्तपेढी काही काळ बंद होती. मात्र, कोविड काळ संपल्यानंतर पुन्हा तत्कालीन स्थायी समितीचे सभापती कुमारसिंह वाकळे यांनी पुढाकार घेऊन 70 ते 80 लाखांची मशिनरी खरेदी करून रक्तपेढी सुरू केली. बाह्य यंत्रणेमार्फत दहा कर्मचाऱ्यांची भरती केली होती. डिसेंबर 2025 पर्यंत रक्तपेढीचे कामकाज सुरळीत सुरू होते.

 Municipal Blood Bank
Jeur Solar Power Project Controversy: जेऊरमधील सौरऊर्जा प्रकल्पावर ग्रामस्थांचा आक्षेप; मनमानी व दडपशाहीचा आरोप

साधारण एका वर्षात रक्तपेढी विविध ठिकाणी कॅम्प घेऊन बारशे ते तेराशे रक्त पिशव्यांचे संकलन करीत होती. त्यावर प्रक्रिया करून अगदी अल्पदरात रुग्णांना रक्त पिशवी पुरविली जात होती. महापालिकेने रक्त पिशवीची किंमत अवघी 100 रुपये ठेवली होती. परंतु, डिसेंबर 2025 रक्तपेढीसाठी राबणाऱ्या बाह्य यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांचा करार संपुष्टात आल्यानंतर पुन्हा रक्तपेढीला घरघर लागली. गेल्या दीड महिन्यांपासून रक्तपेढी बंद असून, लाखो रुपयांच्या मशिनरी धूळखात पडून आहेत. आता नव्याने महापौर आणि उपमहापौर महापालिकेत आले असून, त्यांनी रक्तपेढी सुरू करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.

 Municipal Blood Bank
Ahilyanagar E-Waste Campaign: अहिल्यानगरमध्ये 23 फेब्रुवारीला ई-कचरा निर्मूलन अभियान; मनपाचे नागरिकांना आवाहन

रक्तपेढी खासगीकरणाचा डाव

रक्तपेढी चालविण्यासाठी उत्पन्नापेक्षा जास्त खर्च होत आहे. चोवीस तपास वीज व तंत्रज्ञ कर्मचारी असा खर्च होतो. त्यामुळे रक्तपेढी खासगी संस्थेला चालविण्यास देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. त्यावर महापालिका प्रशासन सध्या विचाराधीन असल्याचे समजते.

 Municipal Blood Bank
Sangamner Mnrega Protest: संगमनेरमध्ये मनरेगा मजुरांचा टाळ-मृदुंगासह अनोखा आंदोलन

कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात जाऊन रक्तपेढीच्या कामकाजाचा आढावा घेतला आहे. लाखो रुपयांची मशिनरी बंद राहणे योग्य नाही. यासंदर्भात आयुक्तांशी चर्चा केली आहे. लवकरच त्यावर निर्णय घेऊन रक्तपेढी पूर्ववत करण्यात येईल.

ॲड. धनंजय जाधव, उपमहापौर, अहिल्यानगर

गेल्या दोन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांअभावी रक्तपेढीचे कामकाज बंद आहे. परंतु, दोन दिवसांपूर्वी रक्तपेढी सुरू करण्यासंदर्भात आयुक्तांबरोबर चर्चा झाली असून, त्यांनी बाह्य यंत्रणेमार्फत कर्मचारी भरण्यास सकारात्मकता दर्शविली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत रक्तपेढी पुन्हा सुरू होईल.

डॉ. शंकर शेडाळे, रक्त संक्रमण अधिकारी, मनपा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news