E-Waste Management: करंजी येथे शाळेत ई-कचरा व्यवस्थापनाबाबत प्रभावी जनजागृती उपक्रम

गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय स्पर्धेअंतर्गत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
E-Waste Management School Program
E-Waste Management School ProgramPudhari
Published on
Updated on

नगर: अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या करंजी येथील श्री नवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगिताअंतर्गत ई-कचरा व्यवस्थापन व संकलन हा एक अत्यंत प्रभावी, कृतिप्रधान व जनजागृती करणारा उपक्रम राबविण्यात आला.

E-Waste Management School Program
Wambori Chari Water Demand: वांबोरी चारीसाठी मुळा धरणातून पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी

शाळेचे मुख्याध्यापक संजय म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली, पर्यवेक्षक जयवंत पुजारी यांच्या देखरेखीखाली प्रकल्पाच्या समन्वयक स्वाती अहिरे यांच्या नियोजनातून यशस्वीरीत्या पार पडला. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.

E-Waste Management School Program
Sugar Factory Technical Efficiency Award: कर्मवीर शंकरराव काळे साखर कारखान्यास तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम पुरस्कार

उपक्रमाच्या प्रारंभी ई-कचरा म्हणजे काय, त्यामध्ये कोणकोणत्या वस्तूंचा समावेश होतो, ई-कचऱ्यातील घातक रसायने कोणती, त्याचा मानवी आरोग्यावर व पर्यावरणावर होणारा परिणाम, तसेच योग्य व्यवस्थापन न झाल्यास भविष्यात उद्भवणारी संकटे याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांना सहज समजेल अशा भाषेत डिजिटल माध्यमाद्वारे व फलक, चित्रे व उदाहरणांच्या माध्यमातून विषय मांडण्यात आला. वापरात नसलेला मोबाईल, फुटलेली स्क्रीन, खराब बॅटरी, तुटलेले चार्जर, जुने हेडफोन, संगणकाचे सुटे भाग हे साधा कचरा नसून ते स्वतंत्रपणे संकलित करून अधिकृत केंद्रांकडे पाठवणे किती आवश्यक आहे, यावर भर देण्यात आला.

E-Waste Management School Program
Cotton Procurement Online Registration: कापूस खरेदीसाठी ऑनलाईन प्रणाली ठप्प; शेतकऱ्यांचा संताप

प्रकल्प समन्वयक स्वाती अहिरे यांनी या उपक्रमाचे नियोजन करताना शिका आणि कृती करा या तत्त्वावर भर दिला. विद्यार्थ्यांना केवळ माहिती देऊन न थांबता प्रत्यक्ष कृतीत सहभागी करून घेण्यात आले. ई-कचरा वेगळा ठेवण्याची पद्धत, ओला व सुका कचरा व ई-कचरा यातील फरक, पुनर्वापर, पुनर्निर्मिती व कमी वापर या त्रिसूत्रीचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.

E-Waste Management School Program
Ahilyanagar Municipal Election Nominations: अहिल्यानगर महापालिका निवडणूक; पाचव्या दिवशी 40 उमेदवारी अर्ज दाखल

लघुचित्रपटाच्या व भाषणांच्या माध्यमातून ई-कचऱ्याचे दुष्परिणाम विद्यार्थ्यांसमोर डिजिटल माध्यमाद्वारे प्रभावीपणे मांडण्यात आले. यामुळे इतर विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकवर्ग आणि उपस्थित नागरिकांमध्येही जागरूकता निर्माण झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news