Ahilyanagar Private Coaching Centers Bill 2026: अहिल्यानगरातील 450 हून अधिक खासगी क्लासेसवर लागणार लगाम; नियमभंगाला तब्बल 50 लाखांचा दंड

महाराष्ट्र प्रायव्हेट कोचिंग सेंटर्स विधेयक 2026 चा कडक मसुदा; डमी स्कूल, तळघरातील क्लासेसवर बंदी, पालकांकडून स्वागत
Coaching Classes
Coaching ClassesPudhari
Published on
Updated on

नगर: राज्य सरकारने महाराष्ट्र प्रायव्हेट कोचिंग सेंटर्स विधेयक, 2026 कडक नियमांचा मसुदा तयार केला आहे. त्यामुळे लवकरच अहिल्यानगरच्याही 450 पेक्षा अधिक खासगी कोचिंग क्लास चालकांच्या मनमानीला अखेर लगाम लागणार आहे. या मसुद्याचे पालकांमधून स्वागत केले जात आहे.

Coaching Classes
Ahilyanagar Sugar Price Rise: साखरेचे दर ८० रुपयांवर; दसरा-दिवाळीपूर्वी कृत्रिम टंचाई रोखण्यासाठी गोडाऊनची झाडाझडती

अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातही अनेक ठिकाणी खासगी क्लासेस चालकांनी अक्षरशः दुकानदारी मांडली आहे. विद्यार्थी आणि पालकांच्या मानसिकतेचा फायदा घेऊन, मनमानी पद्धतीने फी आकारली जात आहे. गुणवत्तेच्या नावाखाली चांगल्या गुणांचे आमिष दाखवून स्वप्ने विकण्याचे काम हे खासगी क्लासचालक करत आहेत. त्यातच नीट पेपरफुटीत खासगी क्लासपर्यंत धागेदोरे पोहचल्याने राज्यातीलच क्लासचालक रडारवर आल्याचे दिसले. त्यामुळे पालकांमधूनही उघडउघड खासगी क्लास चालकांना लगाम लावावा, अशी मागणी होत होती.

Coaching Classes
Malegaon Farmers Water Protest: ‘पाणी आणि शेतकरी हाच आमचा पक्ष!’; हक्काच्या पाण्यासाठी माळेगाव-नेकरांचा ताजनापूर प्रकल्प कार्यालयावर घेराव

दरम्यान, राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत महाराष्ट्र प्रायव्हेट कोचिंग सेंटर्स विधेयक, 2026 हा कायद्याचा मसुदा तयार केला आहे. नियमांचे उ्लंघन करणाऱ्या क्लासचालकाला 50 लाखांपर्यंत दंडाची शिक्षा असणार आहे. हा मसुदा सूचना व हरकतींसाठी खुला करण्यात आला आहे. सप्टेंबरमध्ये यावर अंतिम निर्णय होणार असल्याचे समजते.

Coaching Classes
Ahilyanagar Voter List: अहिल्यानगर जिल्ह्यात ५१ मतदान केंद्रांची वाढ; प्रारूप मतदारयादी २४ ऐवजी ३१ ऑगस्टला

कोणती प्रमुख बंधने येणार!

शाळा आणि कोचिंग क्लासेसमधील एकत्रीकरणावर म्हणजेच इंटीग्रेटेड कोचिंग किंवा डमी स्कूल पद्धतीवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे कनिष्ठ विद्यालयातून असे क्लास घेता येणार नाहीत. आकारलेल्या फीची अधिकृत पावती द्यावी लागणार आहे. अभ्यासक्रम सुरू झाल्यावर फी वाढवता येणार नाही. प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी एक चौरस मीटर जागा, अग्निसुरक्षा प्रमाणपत्र, पिण्याचे पाणी, स्वतंत्र शौचालय आणि एक महिना फुटेज जतन केले जाईल असे सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक असतील.

Coaching Classes
Ahilyanagar Home Guard Drivers: पोलिस वाहनांचे स्टेअरिंग आता होमगार्डच्या हाती; अहिल्यानगरला मिळणार १०० प्रशिक्षित चालक

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळा-विद्यालयावरही कारवाईची तरतूद आहे. तसेच तळघरातील क्लासेसवरही बंदी घातली आहे. शिक्षक हा पदवीधरच असावा, ज्याच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल आहे, अशा व्यक्तीला नोकरीवर ठेवता येणार नाही. 25 पेक्षा जास्त विद्यार्थी असलेल्या कोचिंग क्लासेसची अधिकृत नोंदणी बंधनकारक आहे. 13 वर्षाखालील लहान मुलांना कोणतीही खासगी शिकवणी केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. दिवसातून जास्तीत जास्त पाच क्लास होतील, यासह शुल्क आकारणी, भौतिक सुविधा याबाबतही कडक नियम केल्याचे समजते. हा मसुदा लवकरच कायद्यात रूपांतरित करून लागू करावा, असाही पालकांमधून सूर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news