Ahilyanagar Sugar Price Rise: साखरेचे दर ८० रुपयांवर; दसरा-दिवाळीपूर्वी कृत्रिम टंचाई रोखण्यासाठी गोडाऊनची झाडाझडती

अहिल्यानगर जिल्ह्यात पुरवठा विभागाची तपासणी मोहीम; चार हजार क्विंटलपेक्षा जास्त साठा आढळल्यास व्यापाऱ्यांवर कारवाईचा इशारा
Sugar
Sugar Pudhari
Published on
Updated on

नगर: साखरेचे दर कडाडल्‍याने दसरा-दिवाळी सणाच्‍या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात साखरेची कृत्रिम टंचाई निर्माण होण्‍याची भीती लक्षात घेऊन, जिल्हा पुरवठा विभागाकडून घाऊक आणि किरकोळ विक्रेत्‍यांच्‍या गोडाऊनची तपासणी सुरू आहे. चार हजार क्‍विंटलपेक्षा अधिक साठा आढळून येणार्‍या व्‍यापार्‍यावर कारवाईचा इशारा देण्‍यात आला आहे.

Sugar
Malegaon Farmers Water Protest: ‘पाणी आणि शेतकरी हाच आमचा पक्ष!’; हक्काच्या पाण्यासाठी माळेगाव-नेकरांचा ताजनापूर प्रकल्प कार्यालयावर घेराव

ऑगस्‍ट महिन्‍याच्‍या पहिल्‍या आठवड्यात साखर ४९ रुपये किलो होती. त्‍यानंतर ५२ रुपये झाली. गेल्‍या काही दिवसांत हा दर ८० रुपयांवर पोहोचला आहे. वाढत्‍या दरामुळे श्रावण महिन्‍यातील सण तसेच आगामी दसरा-दिवाळी सणांच्‍या पार्श्वभूमीवर साखरेची कृत्रिम टंचाई आणि साठेबाजी रोखण्‍यासाठी पुरवठा विभागाने जिल्‍हाभरातील साखरेच्‍या घाऊक तसेच किरकोळ दुकानांची तपासणी मोहीम हाती घेतली आहे.

Sugar
Ahilyanagar Voter List: अहिल्यानगर जिल्ह्यात ५१ मतदान केंद्रांची वाढ; प्रारूप मतदारयादी २४ ऐवजी ३१ ऑगस्टला

अहिल्‍यानगर शहरातील काही व्‍यापार्‍यांच्‍या गोडाऊनची तपासणी केली. परंतु चार हजार क्‍विंटलपेक्षा अधिक साठा आढळून आलेला नाही. पाथर्डी तालुक्‍यातदेखील तपासणी झाल्‍याचा अहवाल विभागाला प्राप्‍त झाला. तेथेही काही आढळून आले नसल्‍याचे विभागाने म्‍हटले आहे. साखरेचे दर वाढल्याने बाजारपेठेत साखरेची उपलब्धता आणि साठ्याबाबत जिल्‍हा पुरवठा विभागाच्‍या वतीने विशेष लक्ष दिले जात आहे. व्‍यापार्‍यांना केंद्रीय अन्‍नधान्‍य पोर्टलवर नोंदणी करणे आणि दर शुक्रवारी साठ्याबाबत माहिती पोर्टलवर टाकण्‍याचे बंधनकारक करण्‍यात आल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news