Ahilyanagar Crime: एमआयडीसीत कुंटणखान्यावर छापा; तीन महिलांची सुटका; महिला चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

अहिल्यानगरच्या एमआयडीसी परिसरातील गजानन कॉलनी येथे स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत तीन पीडित महिलांची सुटका केली. प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
Ahilyanagar Crime
Ahilyanagar CrimePudhari
Published on
Updated on

नगर: स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एमआयडीसी परिसरातील गजानन कॉलनी येथे सुरू असलेल्या कुंटणखान्यावर छापा टाकून तीन पीडित महिलांची सुटका केली आणि कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेचे ताब्यात घेतले. ही कारवाई २ सप्टेंबर रोजी करण्यात आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्यासाठी प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक कल्पना पवार व एलसीबीचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तैनात करण्यात आले होते.

Ahilyanagar Crime
Ahilyanagar Illegal Injection Sale: जिममध्ये होतोय नशेच्या इंजेक्शनचा पुरवठा; कोतवाली पोलिसांची कारवाई

या पथकात पोलिस उपनिरीक्षक संदीप दरवडे, पोलिस अंमलदार विकास साळवे, विष्णू भागवत, शाहीद शेख, बिरप्पा करमल, अशोक लिपणे, विजय ठोंबरे, महिला पोलीस अंमलदार चिमा काळे यांचा समावेश होता.

रजनी प्रभाकर डहाळे (वय ५६, रा. गजानन कॉलनी, एमआयडीसी) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिस पथक २ सप्टेंबर २०२६ रोजी एमआयडीसी हद्दीत गस्तीवर असताना गजानन कॉलनी येथील रजनी प्रभाकर डहाळे ही महिला तिच्या घरात कुंटणखाना चालवत असल्याची गोपनीय माहिती मिळाली.

Ahilyanagar Crime
Ahilyanagar Water Scarcity: जिल्ह्यावर दुष्‍काळाचे काळे ढग, पावसाची दडी; टंचाईग्रस्‍त गावे वाढली

त्यानुसार पोलिसांनी माहितीची शहानिशा करण्यासाठी एका पोलिस अंमलदाराला बनावट ग्राहक म्हणून पाठवले. वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खात्री पटताच पथकाने तात्काळ घरामध्ये छापा टाकला. या छाप्या दरम्यान पोलिसांनी संशयित आरोपी रजनी डहाळे हिला ताब्यात घेतले.

घराची झडती घेतली असता तेथे तीन महिला मिळून आल्या. आरोपी महिला ग्राहकांकडून पैसे घेऊन या महिलांकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी तात्काळ तिन्ही पीडित महिलांची सुटका केली.

याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात पिटा कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आली. गुन्ह्याचा तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news