Ahilyanagar Illegal Injection Sale: जिममध्ये होतोय नशेच्या इंजेक्शनचा पुरवठा; कोतवाली पोलिसांची कारवाई

याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
Ahilyanagar Illegal Injection Sale
Ahilyanagar Illegal Injection SalePudhari
Published on
Updated on

नगर: गांधी मैदान परिसरातून डॉक्‍टरांच्या चिठ्ठीशिवाय विक्रीसाठी आणलेल्या नशेच्या इंजेक्शनचा साठा जप्त करीत पोलिसांनी दोघांना पकडले. त्यांच्याकडून ३५ हजारांचे इंजेक्शनस्‌ जप्त केले.

नशेचे इंजेक्शन जिममध्ये तरुणांना विक्री केले जाणार असल्याचे तपासात समोर आले. तर, दुसऱ्या कारवाईत केडगाव घराच्या बाजूला गांजा लावणाऱ्याला ताब्यात घेऊन १८.२५ किलोग्रॅम गांजा जप्त केला. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

Ahilyanagar Illegal Injection Sale
Ahilyanagar Water Scarcity: जिल्ह्यावर दुष्‍काळाचे काळे ढग, पावसाची दडी; टंचाईग्रस्‍त गावे वाढली

प्रताप अकोलकर , तेजस वारुळे , तेजस उढागडडे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.पोलिस उपनिरीक्षक गणेश देशमुख यांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने गांधी मैदान परिसरात छापा घालून तिघांना ताब्यात घेतले.

त्यांची झडती घेतली असता १५ हजार रुपये किमतीचे मेफेन टरमाईन इंजेक्शनच्या ४० बाटल्या व वीस हजारांची दुचाकी असा ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिस अंमलदार रोहिणी दरंदले यांनी पोलिसांत फिर्याद दिली.

गुन्ह्याच्या तपासात डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विक्रीसाठी आणलेले नशेचे इंजेक्शन जिममधील तरुणाना विक्री केले जाणार असे तपासात समोर आले आहे. गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश देशमुख करत आहेत.

ही कारवाई पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप टिपरसे, कल्पना पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नितीन देशमुख, सपोनि कुणाल सपकाळे, उपनिरीक्षक गणेश देशमुख, पोलिस अंमलदार रोहिणी दरंदले, राहुल शिंदे, विनोद बोरगे, साबिर शेख, विशाल दळवी यांच्या पथकाने केली.

Ahilyanagar Illegal Injection Sale
Kidnapping Case: पुण्यातून अपहरण; शिर्डीजवळ सुटका; सहा जण जेरबंद

केडगावमध्ये बेकायदेशीर गांजा जप्त

केडगावातील वैष्णवनगर, तिरंगा चौक येथे एका इसमाने स्वतःच्या घराजवळ विनापरवाना गांजाचे झाड लावून विक्री करत असल्याची बातमी पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांना मिळाली. सहायक पोलिस निरीक्षक कुणाल सपकाळे व पथकाने छापा टाकून घराच्या कंपाउंडमधून गांजाचे झाड जप्त करून विकास बाळू उमाप (वय ३५, रा. तिरंगा चौक, केडगाव) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक लाख ८२ हजार ५०० रुपयांचा १८.२५ किलोग्रॅम गांजा जप्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news