Ahilyanagar Cyber Fraud: ऑनलाईन रेटिंगच्या आमिषाने हॉटेल व्यावसायिकाला 25.94 लाखांचा गंडा

व्हॉट्सॲपवरून संपर्क साधून सायबर भामट्यांची फसवणूक; अहिल्यानगर सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Cyber Fraud
Cyber FraudPudhari
Published on
Updated on

नगर: हॉटेलला ऑनलाईन रेटिंग देण्याचे आमिष दाखवून अहिल्यानगर शहरातील एका सायबर भामट्यांनी 25 लाख 94 हजार 390 रुपयांना गंडा घातला. हा प्रकार रोजी घडला. याप्रकरणी 6 ते 11 नोव्हेबर 2025 दरम्यान घडला. याप्रकरणी 6 मार्च 2026 रोजी सायबर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दीपक नायर उर्फ नविनराज आणि मेघा उर्फ मालू अशी त्या सायबर भामट्यांची नावे आहेत.

Cyber Fraud
Kanifnath Madhi Yatra: रंगपंचमीच्या पूर्वसंध्येला मढीत कानिफनाथ समाधी दर्शनासाठी लाखो नाथभक्तांची गर्दी

याबाबत हॉटेल व्यवसायिक सचिन प्रकाश काटे रा. प्रोफेसर कॉलनी चौक, अहिल्यानगर यांनी पोलिसांत फिर्याद दिली. 6 नोव्हेंबर 2025 ते 11 नोव्हेंबर 2025 रोजी संशयित आरोपी दीपक नायर उर्फ नविनराज आणि मेघा उर्फ मालू या दोघांनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून फिर्यादीशी संपर्क साधला. हॉटेलला ऑनलाइन रेटिंग दिल्यास तुम्हाला 20 ते 30 टक्के नफा मिळवून देतो, अशी थाप मारून त्यांनी फिर्यादीचा विश्वास संपादन केला.

Cyber Fraud
Rahuri Bypoll Politics: राहुरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तनपुरे यांच्या भाजप प्रवेश चर्चेने खळबळ

या आमिषाला बळी पडून फिर्यादीने आरोपींना वेळोवेळी25 लाख 94 हजार 390 रुपये दिले. मात्र, त्याचा परतावा न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर फिर्यादीने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी दीपक नायर आणि मेघा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पोलिस निरीक्षक सागर ढिकले करीत आहेत.

सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे अमिष दाखविले जात आहेत. अशा अमिषाला नागरिकांनी बळी पडू नये सोशल मीडियावर असलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करताना शहानिशा करावी. फसवणूक झाल्यास तत्काळ सायबर पोलिस ठाण्यात संपर्क साधावा.

सागर ढिकले, पोलिस निरीक्षक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news