Ahilyanagar Municipal Health Center: 10 रुपयांत उपचार; मनपाच्या आरोग्य सेवांकडे नागरिकांचा पाठ फिरव

दरमहा 40 लाख खर्चूनही खासगी रुग्णालयांकडे कल; आयुक्तांचे आवाहन
Ahilyanagar Municipal Health Center
Ahilyanagar Municipal Health CenterPudhari
Published on
Updated on

नगर: अहिल्यानगर महानगरपालिका नागरिकांच्या आरोग्यासाठी दर महिन्याला सुमारे 40 लाखांचा खर्च करीत आहे. मनपाच्या सात प्राथमिक आरोग्य केंद्र व 18 आरोग्यवर्धिनी केंद्रावर अवघ्या दहा रुपयांचा उपचार सुविधा व मोफत तपासण्या उपलब्ध आहेत. चांगल्या प्रतीची औषधे व अनुभवी डॉक्टरस उपलब्ध आहेत. असे असतानाही नागरिक खासगी दवाखान्यात जात असल्याचे दिसून येते. त्यामुळे नागरिकांनी महापालिकेच्या आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी केले आहे.

Ahilyanagar Municipal Health Center
Ahilyanagar Water Scarcity: अहिल्यानगरात पाणीटंचाईची झळ; 26 गावे टँकरवर

शहरातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी शासन व महानगरपालिकेकडून मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केला जातो. सध्या शहरात 7 प्राथमिक आरोग्य केंद्रे, 18 आयुष्मान आरोग्य मंदिर नागरी आरोग्य केंद्रे आणि 2 हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अशी एकूण 27 आरोग्य केंद्रे कार्यरत आहेत. या सर्व केंद्रांवर मिळून 142 कर्मचारी नागरिकांच्या सेवेसाठी कार्यरत असून, दरमहा सुमारे 39 लाख 30 हजार रुपये खर्च केला जातो.

Ahilyanagar Municipal Health Center
Ahilyanagar Property Survey Issue: मालमत्ता सर्वेक्षणावर नगरसेवकांचा सवाल; पारदर्शकतेसाठी बैठक मागणी

प्राथमिक आरोग्य केंद्र व नागरी केंद्रांमध्ये केवळ 5 रुपयांचा केसपेपर व 5 रुपयांची औषधे अशा एकूण 10 रुपयांत संपूर्ण उपचार दिले जातात. तसेच मोफत तपासण्या, गुणवत्तापूर्ण औषधे व प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध आहेत. तरीही अनेक नागरिक या सुविधांकडे दुर्लक्ष करून खासगी रुग्णालयांचा पर्याय निवडत असल्याचे दिसून येते असे मनपाने म्हटले आहे.

Ahilyanagar Municipal Health Center
Ahilyanagar Government Employees Strike: अहिल्यानगरात कर्मचाऱ्यांचा धडक मोर्चा; जुनी पेन्शनसाठी आंदोलन तीव्र

शहरातील नागरी आरोग्य केंद्र

जिजामाता नागरी आरोग्य केंद्र, केडगाव नागरी आरोग्य केंद्र, महात्मा फुले नागरी आरोग्य केंद्र, तोफखाना नागरी आरोग्य केंद्र, मुकुंदनगर नागरी आरोग्य केंद्र, नागापूर नागरी आरोग्य केंद्र, यशोदा नगर सिव्हिल नागरी आरोग्य केंद्र, शिवाजी नगर नागरी आरोग्य केंद्र (कल्याण रोड), सिद्धार्थ नगर नागरी आरोग्य केंद्र, रामवाडी नागरी आरोग्य केंद्र, टीव्ही सेंटर नागरी आरोग्य केंद्र, हिम्मतनगर नागरी आरोग्य केंद्र, ढवण वस्ती नागरी आरोग्य केंद्र, दगडी चाळ नागरी आरोग्य केंद्र, तपोवन रोड नागरी आरोग्य केंद्र, वैदुवाडी नागरी आरोग्य केंद्र, बोल्हेगाव गावठाण नागरी आरोग्य केंद्र, इंदिरा नगर नागरी आरोग्य केंद्र, भूषण नगर नागरी आरोग्य केंद्र, संजय नगर नागरी आरोग्य केंद्र, सारसनगर नागरी आरोग्य केंद्र (मधुबन कॉलनी), त्रिमूर्ती चौक नागरी आरोग्य केंद्र (सारसनगर), रेल्वे स्टेशन नागरी आरोग्य केंद्र, शास्त्री नगर नागरी आरोग्य केंद्र, ठुबे मळा नागरी आरोग्य केंद्र. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना नालेगाव व श्रमिकनगर.

Ahilyanagar Municipal Health Center
Maharashtra Fertilizer Dealers Strike: कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा 27 एप्रिलपासून बेमुदत बंद

महानगरपालिकेची सर्व आरोग्य केंद्रे ही नागरिकांच्या सेवेसाठीच उभी करण्यात आली असून येथे खासगी रुग्णालयांच्या तोडीच्या सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक खर्च टाळून महानगरपालिका आरोग्य केंद्रात जाऊन केवळ 10 रुपयांत उपलब्ध होणाऱ्या या दर्जेदार आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा.

यशवंत डांगे, आयुक्त, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news