Ahilyanagar Municipal Corporation Tax: अहिल्यानगर महापालिकेची कर वसुली कासवगतीने! २६१ कोटींची थकबाकी

२८९ कोटींच्या मागणीपैकी अवघी २७.९३ कोटी वसुली; थकबाकीदारांना नोटिसा, नळजोडणी तोडण्यासह मालमत्ता जप्तीचा इशारा
Ahilyanagar Municipal Corporation
Ahilyanagar Municipal CorporationPudhari
Published on
Updated on

डॉ. सूर्यकांत वरकड

नगर: १ एप्रिल ते १ सप्टेंबर २०२६ दरम्यान महापालिकेची एकूण २८९ कोटी १७ लाख रुपयांची कर मागणी असताना अवघी २७ कोटी ९३ लाखांची वसुली झाली आहे. महापालिकेचे तब्बल २६१ कोटी २३ लाख रुपये थकबाकीच्या रूपात अडकून पडले आहेत. महानगरपालिकेच्या कर संकलन व वसुली कासवगतीने सुरू आहे.

Ahilyanagar Municipal Corporation
Ahilyanagar DJ Ban: अहिल्यानगरात गणेशोत्सव-नवरात्रोत्सवात डीजे बंदी! भाड्याने देण्यावरही प्रशासनाचा बडगा

अहिल्यानगर महापालिकेची कर वसुली आणि खर्च यामध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे महापालिकेकडून उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यावर भर दिला आहे. दरवर्षी महापालिकेची थकबाकी वाढत चालली आहे. त्यामुळे यंदा मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुलीसाठी महापालिका प्रशासनाकडून व्यापक मोहीम आखण्यात आली आहे. तरीही गेल्या चार महिन्यात वसुलीची संथगती आहे. प्रभाग समितीनिहाय वसुलीचा आढावा महापालिकेच्या चारही प्रभाग समित्यांमध्ये मागील थकबाकी वसुलीचे प्रमाण अत्यंत कमी आहे.

Ahilyanagar Municipal Corporation
Ahilyanagar Drought: अहिल्यानगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट! ६९२ पाझर तलाव कोरडे; ४१ हजार हेक्टर खरीप धोक्यात

महानगरपालिका क्षेत्रात १ लाख ३१ हजार ३२८ नोंदणीकृत मालमत्ता आहेत. यामध्ये ८४,३४५ निवासी, १६,४२७ अनिवासी आणि ३०,५५६ मोकळ्या जागांचा समावेश आहे. प्रभाग समिती १ मध्ये सर्वाधिक ५९,३९२, तर प्रभाग समिती ३ मध्ये सर्वात कमी ११,४४८ मालमत्ता आहेत. ५२ हजारांहून अधिक नळ जोडण्या महापालिका हद्दीत एकूण ५२ हजार ७३८ अधिकृत नळ कनेक्शन आहेत. यामध्ये ४९,०९८ निवासी, २,२७७ अनिवासी आणि १,३६३ मिश्र वापराच्या जोडण्या आहेत. आकाराचा विचार करता ०.५ इंच आकरणाच्या जोडण्यांची संख्या सर्वाधिक म्हणजेच ५२,१३७ इतकी आहे. महापालिकेचा गाडा हाकण्यासाठी आणि शहरातील विकासकामांना गती देण्यासाठी प्रशासनाला येत्या काळात थकबाकीदारांविरोधात कडक पावले उचलण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

Ahilyanagar Municipal Corporation
Ahilyanagar Police: गणेशोत्सवासाठी अहिल्यानगर पोलिसांचा कडक बंदोबस्त! ४९२ जण दोन दिवस हद्दपार

थकीत मालमत्ताधारकांना नोटिसा

महापालिका हद्दीत ८६३ मालमत्तांची एक लाखांच्या पुढे थकीत आहेत. त्या सर्व मालमत्ताधारांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. तर, एक लाखांच्या आतील १२५४ मालमत्ताधारांनाही नोटिसा काढण्यात आल्या असून, त्या नोटिसांची बजावणी सुरू आहे. त्यातील सुमारे ६०० नोटिसांचे वाटप करण्यात आले आहे. मालमत्ताधारांनी सात दिवसांच्या आत थकबाकी न भरल्यास नळकनेक्शन कट करणे अथवा मालमत्ता जप्ती वारंट काढण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

Ahilyanagar Municipal Corporation
Ahilyanagar Rain: बाप्पाच्या आगमनाआधी अहिल्यानगरात पावसाची हजेरी!

कर वसुली आणि देणी यामध्ये मोठी तफावत आहे. थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कर वसुलीसाठी व्यापक मोहीम आखण्यात आली आहे. एक लाखांच्या पुढील थकबाकीदारांचे नळ तोडणे आणि मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. थकबाकीदारांनी तत्काळ कर भरणा करावा. कर्तव्यात कसूर करणाऱ्या वसुली कर्मचाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगरला जाणार आहे.

यशवंत डांगे, आयुक्त, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news