Ahilyanagar Municipal Employee Attack: मुकुंदनगरमध्ये महापालिका कर्मचाऱ्यावर जमावाचा जीवघेणा हल्ला; प्रकृती चिंताजनक

पथदिव्याचे पोल टाकताना कंत्राटी कर्मचाऱ्याला मारहाण; कर्मचारी संघटनेचा तीव्र निषेध, आजपासून सेवा बंदचा इशारा
Ahilyanagar Municipal Employee Attack
Ahilyanagar Municipal Employee AttackPudhari
Published on
Updated on

नगर: अहिल्यानगर महापालिकेचे कंत्राटी कर्मचारी मुकुंदनगर परिसरात पोल टाकण्याचे काम करीत होते. त्यावेळी जमावाने एका कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला केल्या. त्यात तो गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. धीरज परदेशी असे हल्ला झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

Ahilyanagar Municipal Employee Attack
Ahilyanagar Estimates Committee: ‘सचिवांपुढे साक्ष लावू’; अंदाज समितीचा अधिकार्‍यांना दम, जिल्हाभरात टेन्शन

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, महापालिकेचे कर्मचारी शुक्रवारी दुपारी मुकुंदनगर परिसरात पथदिव्याचे पोल टाकण्याचे काम करीत होते. त्यावेळी काही कंत्राटी कर्मचारी बरोबर होते. पोल टाकण्याचे काम सुरू असताना जमावाने अचानक कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात धीरज परदेशी गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Ahilyanagar Municipal Employee Attack
Sina River Deepening Cost: ‘सीना’ खोलीकरणाच्या खर्चावर अंदाज समितीचा सवाल; १७३ रुपये प्रतिक्युबिक मीटर दरावर आक्षेप

त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. या घटनेची माहिती समजल्यानंतर खासगी रुग्णालयात शहरातील हिंदुत्वावादी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. पोलिस उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे यांच्यासह पथकाने खासगी रुग्णालयात धाव घेतली होती. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर भिंगार पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसानी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असून, आरोपींचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

Ahilyanagar Municipal Employee Attack
Caste certificate verification| जात प्रमाणपत्र रद्दप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना: पालकमंत्री विखे पाटील

मुकुंदनगरमधील सेवा बंद ठेवणार

कर्मचाऱ्यावर जमावाकडून हल्ला झाल्यानंतर महापालिका कर्मचारी युनियनने महापालिकेसमोर तीव्र निषेध आंदोलन केले. मुकुंदनगरमध्ये कर्मचाऱ्यांना सेवा देणे कठीण जात आहे. वारंवार कर्मचाऱ्यांना अशा घटनासमोरे जावे लागत आहे. जमावाकडून कर्मचाऱ्यावर झालेला हल्ला अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळे उद्यापासून मुकुंदनगर मनपाच्या पाणी, सफाई व आरोग्य असे सर्व सेवा बंद करण्यात येणार असल्याचा इशारा संघटनेने दिला.

Ahilyanagar Municipal Employee Attack
Rahuri gambling raid: डिग्रसमध्ये जुगार अड्ड्यावर छापा; सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त; चौघांविरुद्ध गुन्हा

आमदार जगताप यांची रुग्णालयात धाव

महापालिका कर्मचाऱ्याला मुकुंदनगर परिसरात मारहाण झाल्याची माहिती मिळताच आमदार संग्राम जगताप जखमी कर्मचाऱ्यावर उपचार सुरू असलेल्या खासगी रुग्णालयात धाव घेतली. जखमी कर्मचाऱ्याची पाहणी करून उपचार करणाऱ्या डॉक्टर डॉ. सतीश सोनवणे यांच्याशी चर्चा केली. यावेळी हिंदुत्वादी कार्यकर्त्यांनी रुग्णालयात गर्दी केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news