Rahuri gambling raid: डिग्रसमध्ये जुगार अड्ड्यावर छापा; सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त; चौघांविरुद्ध गुन्हा

या कारवाईत चार जणांना ताब्यात घेवून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Gambling
GamblingPudhari
Published on
Updated on

राहुरी: तालुक्यातील डिग्रस येथील जुगार अड्ड्यावर राहुरी पोलिसांनी छापा टाकून, सुमारे १ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत चार जणांना ताब्यात घेवून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डिग्रस येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये रम्मी नावाचा हार-जित जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिस निरीक्षक रविंद्र देशमुख यांना मिळाली. त्यांच्या आदेशानुसार पोलिस हवालदार सूरज गायकवाड, राहुल यादव, देविदास कोकाटे, प्रमोद ढाकणे, सचिन ताजणे, सतीश कुऱ्हाडे व चालक संदीप रोकडे आदींच्या पथकाने दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घटनास्थळी छापा टाकला.

Gambling
Rahuri News: सासरचा छळ! व्हॉट्सॲप स्टेटसवर सुसाईड नोट ठेवत तरुणाने संपवल जीवन

छाप्यादरम्यान काही जुगारी रम्मीचा जुगार खेळत असल्याचे आढळले. पोलिसांनी त्यांना जागेवर ताब्यात घेतले. १२ हजार ४५० रुपये रोकड व जुगारासाठी वापरलेले साहित्य आदी इतर वस्तूंसह एकूण १ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

Gambling
Ahilyanagar voter list revision: जिल्ह्यातील सव्‍वाचार लाख मतदारांची वगळणी; ३३ लाख ९४ हजार मतदारांची प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध होणार

याप्रकरणी पोलिस नाईक नदिम शेख यांच्या फिर्यादीवरून दिलीप यमनाथ पवार, किशोर रमेश भोसले, विशाल अशोक काळे व प्रकाश रामभाऊ ठोकळ (सर्व रा. डिग्रस, ता. राहुरी) यांच्याविरुद्ध जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास राहुरी पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news