Fake Scented Tobacco Factory Raid: अहिल्यानगर MIDC परिसरात बनावट सुगंधीत तंबाखू कारखाना उध्वस्त; तिघांना अटक

गजराजनगर येथे एलसीबी व एमआयडीसी पोलिसांची कारवाई; ₹13.92 लाखांचा मुद्देमाल जप्त करून अवैध कारखाना उघड
Fake Tobacco
Fake TobaccoPudhari
Published on
Updated on

नगर: स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गजराजनगर येथील बनावट सुगंधीत तंबाखू तयार करण्याचा कारखाना उद्ध्वस्त करून तिघांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून 13 लाख 92 हजार 190 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Fake Tobacco
Ashok Kharat: समता पतसंस्थेत मोठा घोटाळा; डॉक्टर दाम्पत्याच्या नावाने ₹1.2 कोटी व्यवहाराचा संशय

असिफ खुदाबक्ष तांबोळी (वय 50, रा. मुकुंदनगर), जफर चाँद शेख (वय 38, रा. मुकुंदनगर), दाऊद बाबुमियाँ शेख (वय 42, रा. सदर बाजार भिंगार, ता. जि. अहिल्यानगर) असे ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.

Fake Tobacco
Ahilyanagar Theatre Auditorium Project: अहिल्यानगरकरांचे स्वप्न साकार; 1000 आसनक्षम नाट्यसंकुलाचे 80 टक्के काम पूर्ण

पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाई करण्याचे आदेश दिले. दि. 18 एप्रिल 2026 रोजी पोलिस पथक अहिल्यानगर शहरामध्ये पेट्रोलिंग करून अवैध धंद्याची माहिती काढत असताना माहिती मिळाली.

Fake Tobacco
Sandalwood Theft: नगर तालुक्यात वन कार्यालयात चंदन तस्करांची धाडसी चोरी

असिफ तांबोळी (रा. मुकुंदनगर) हा साथीदारांसह कालीमाता मंदिराजवळ, गजराजनगर येथे घरामध्ये साधी तंबाखू आणून त्यापासून बनावट सुगंधीत तंबाखू तयार करण्याचा कारखाना चालवित आहेत. त्यानुसार पोलिस पथकाने तत्काळ अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बडे यांना माहिती दिली.

Fake Tobacco
Maharashtra Fake Godman Fraud: संगमनेरमध्ये भोंदूबाबा राजेंद्र गडगेचा पर्दाफाश

अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांसह पथकाने गजराज नगर येथे छापा घालून बनावट सुगंधीत तंबाखू तयार करताना तिघांना रंगेहाथ पकडले. त्यांनी वरीलप्रमाणे नावे सांगितली. त्यांच्याकडून बनावट सुगंधीत तंबाखूसह 13 लाख 92 हजार 190 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news