Ahilyanagar Voter Mapping: अहिल्यानगर शहर मतदारसंघात मॅपिंग संथ; नोंदणी न करणाऱ्यांना सुनावणीचा इशारा

80% काम पूर्ण, पण शहर मतदारसंघ मागे; 8 दिवसांत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन
Voting Percentage
Voting Pudhari
Published on
Updated on

नगर: गेल्या पाच महिन्यांपासून मतदारांचे ‌‘मॅपिंग‌’करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, पर्यवेक्षक मतदारांच्या दारापर्यंत पोहोचत आहेत. मात्र, अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात मतदारांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे या मतदारसंघातील ‌‘मॅपिंग‌’ संथगतीने सुरू आहे. येत्या आठ दिवसांत ‌‘मॅपिंग‌’ न करणाऱ्या मतदारांना आगामी काळात सुनावणीला सामोरे जावे लागेल, असा इशारा निवडणूक यंत्रणेने दिला आहे.

Voting Percentage
Private School Stationery Issues: शाळांकडून दुकानांची सक्ती थांबवा; शिक्षण विभागाचा कठोर इशारा

पश्चिम बंगाल, तमिळनाडू, गोवा, गुजरातपाठोपाठ महाराष्ट्रात एसआयआर कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाकडून कोणत्याही वेळी लागू होण्याची शक्यता असल्याने मतदारयादी पडताळणी करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. जिल्ह्यात सरासरी 80 टक्के ‌‘मॅपिंग‌’चे काम झाले आहे. यामध्ये अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघाची टक्केवारी 58.57 टक्के अशी सर्वात कमी आहे. या मतदारसंघातील 3 लाख 24 हजार 570 मतदारांपैकी 1 लाख 90 हजार 102 मतदारांनी आतापर्यंत ‌‘मॅपिंग‌’ केले. अद्याप 1 लाख 34 हजार 468 मतदारांचे ‌‘मॅपिंग‌’ बाकी आहे.

Voting Percentage
Nagar Taluka Wildlife Survey: बुद्ध पौर्णिमेला वन्यप्राण्यांची गणना; नगर तालुक्यात रानडुकरांची संख्या सर्वाधिक

ज्या मतदारांनी ‌‘मॅपिंग‌’ केले नसेल अशा मतदारांना आठ दिवसांची मुदत देण्यात आलेली आहे. त्यामुळे मतदारांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन या मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी सुधीर पाटील यांनी केले आहे. ज्या मतदारांचे ‌‘मॅपिंग‌’ होणार नाही, अशा मतदारांना आगामी काळात होणाऱ्या मतदार याद्यांचे सखोल पुनरिक्षण कार्यक्रमादरम्यान मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या सुनावणीस सामोरे जावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news