Ahilyanagar Loudspeaker Permission 2026: अहिल्यानगर जिल्ह्यात २०२६ मध्ये १५ दिवस ध्वनिक्षेपकांना परवानगी

शिवजयंती, आंबेडकर जयंती, महाराष्ट्र दिनसह १३ दिवस निश्चित; उर्वरित दोन दिवस गरजेनुसार, ध्वनी प्रदूषण नियमांचे पालन बंधनकारक
Loudspeaker
LoudspeakerPudhari
Published on
Updated on

नगर: 2026 या वर्षभरातील सण व उत्सवांच्या काळात जिल्हाभरात 15 दिवस सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनीवर्धक वापरण्यास जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी परवानगी दिली आहे. यामध्ये गुरुवारी (दि.19) होणाऱ्या शिवजयंती तसेच 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, 1 मे रोजीचा महाराष्ट्र दिन आदींचाही समावेश आहे.

Loudspeaker
Anuradha Thakur Soul Artist Journal: अहिल्यानगरच्या चित्रकार अनुराधा ठाकूर यांची ‘साऊल आर्टिस्ट जर्नल’मध्ये झळाळी

राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाचे आदेश व सुधारित ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम 2017 नुसार ही सूट जाहीर करण्यात आली असून, श्रोतृगृहे, सभागृहे व मेजवानी कक्ष यांसारख्या बंद जागा वगळता इतर ठिकाणी ही सवलत लागू राहणार आहे. या उत्सव काळात ध्वनी प्रदूषण नियम 2000 मधील तरतुदींचे पालन करणे बंधनकारक आहे. पोलिस प्रशासनाने शांतता क्षेत्राची माहिती घेऊन ध्वनीचे नमुने घ्यावेत व याबाबतची नोंद पंचनामा करून ठाणे दैनंदिनीमध्ये करावी.

Loudspeaker
Ahilyanagar Sweekrut Corporator: अहिल्यानगर महापालिकेत स्वीकृत नगरसेवकासाठी शिवसेनेत रस्सीखेच

ध्वनी प्रदूषणाबाबत सर्वसामान्य जनतेची तक्रार आल्यास घटनास्थळी जाऊन पंचांसमक्ष ध्वनीची तीव्रता मोजावी व छायाचित्रण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी आदेशात दिले आहेत.

Loudspeaker
Mula Dam Rabi Irrigation: मुळा धरणातून २३ फेब्रुवारीपासून रब्बी आवर्तन; ३० हजार हेक्टर क्षेत्राला लाभ

मोजलेली तीव्रता विहित मर्यादेपेक्षा अधिक आढळल्यास अहवाल उचित प्राधिकरणाकडे पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. निवडणूक काळात निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही या आदेशात देण्यात आल्या आहेत.

Loudspeaker
Adsul Polytechnic Technofest: ‘आडसूळ‌’मध्ये राज्यस्तरीय टेक्नोत्सव उत्साहात

13 दिवस निश्चित : दोन दिवस आवश्यकतेनुसार

जिल्हा प्रशासनाने निश्चित केलेल्या 15 दिवसांत 19 फेब्रुवारीची शासकीय शिवजयंती, 14 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, 1 मे महाराष्ट्र दिन व 26 ऑगस्ट ईद-ए-मिलाद, गणपती उत्सवात 15 सप्टेंबर रोजीचा दुसरा दिवस, 18 सप्टेंबर गौरी पूजन, 19 सप्टेंबर गौरी विसर्जन व 25 सप्टेंबर अनंत चतुर्दशी, नवरात्रोत्सव 11 ऑक्टोबर रोजीची अष्टमी, 20 ऑक्टोबर नवमी, दीपावलीमध्ये 8 नोव्हेंबर लक्ष्मीपूजन, 25 डिसेंबर ख्रिसमस व 31 डिसेंबर या 13 दिवशी ध्वनिक्षेपकासाठी सूट देण्यात आली. उर्वरित दोन दिवसांसाठी शासनाच्या अटींच्या अधीन राहून आवश्यकता वाटल्यास परवानगी दिली जाणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news