Ahilyanagar Gambling Den Raid: अहिल्यानगरमध्ये जुगार अड्ड्यावर एलसीबीचा धाडसी छापा; सात जण ताब्यात, 1.67 लाखांचा मुद्देमाल जप्त

भिंगार कॅम्प हद्दीतील सारसनगरमध्ये कारवाई; रोख रक्कम, मोबाईल व जुगाराचे साहित्य जप्त, अवैध धंद्यांविरोधातील मोहीम अधिक तीव्र
Ahilyanagar Gambling Den Raid
Ahilyanagar Gambling Den RaidPudhari
Published on
Updated on

नगर: अवैध धंद्यांविरुद्ध सुरू असलेल्या धडक मोहिमेचा भाग म्हणून स्थानिक गुन्हे शाखेने भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याच्या हद्दीत जुगार अड्ड्यावर छापा घातला. या कारवाईत पोलिसांनी ७ जणांना ताब्यात घेतले असून, रोख रकमेसह एकूण १ लाख ६७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Ahilyanagar Gambling Den Raid
Ahilyanagar Zilla Parishad Free MS-CIT Training: अहिल्यानगर जिल्हा परिषदेचा मोठा निर्णय; 600 हून अधिक मुलींना मोफत MS-CIT प्रशिक्षण

पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार अरविंद भिंगारदिवे, सुनील पवार, पंकज व्यवहारे, योगेश भिंगारदिवे व योगेश कर्डिले यांच्या विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती.

Ahilyanagar Gambling Den Raid
Karjat Nagar Panchayat No Confidence Motion: कर्जत नगरपंचायतीत अविश्वासाचा थरार; उपनगराध्यक्ष मेहत्रेंच्या भवितव्यावर आज निर्णय

१३ जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, सोलापूर रोड लगत असलेल्या सारसनगर येथील हॉटेल 'आरवी'च्या बाजूला, एका चालू बांधकामाच्या आडोशाला काही व्यक्ती जुगार खेळत आहेत.

Ahilyanagar Gambling Den Raid
Shrirampur Crime Protest: श्रीरामपूर बंदचा तिसरा दिवसही कडक; गुन्हेगारीविरोधात जनआक्रोश, आज भव्य मोर्चा

त्यानुसार पथकाने घटनास्थळी जाऊन खात्री केली असता, काही व्यक्ती बांधकामाच्या आडोशाचा फायदा घेऊन जुगार खेळत होते. पोलिसांनी छापा घालून सात जणांना रंगेहाथ पकडले.

Ahilyanagar Gambling Den Raid
Karjat Road Potholes: कर्जतचा दोन कोटींचा मुख्य रस्ता खड्ड्यांत; निकृष्ट कामामुळे ठेकेदारावर कारवाईची मागणी

बाबासाहेब बेरड (वय ५६, रा. दरेवाडी, ता. जि. अहिल्यानगर), संजय प्रभाकर तडके (वय ६२, रा. कोठी स्टेशन रोड, अहिल्यानगर), भास्कर जगधने (वय ६२, रा. सोलापूर रोड, अहिल्यानगर), संजय भिंगारदिवे (वय ५४, रा. दरेवाडी, ता. जि. अहिल्यानगर), सुधीर शिंदे (वय ५५, रा. स्टेशन रोड, अहिल्यानगर), महादेव कराळे (वय ४६, रा. आगडगाव, ता. जि. अहिल्यानगर), राजू भिवा मोरे (वय ५३, रा. आदर्शनगर, श्रीरामपूर) असे ताब्यात घेतल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, मोबाईल असा १ लाख ६७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news