Shrirampur Crime Protest: श्रीरामपूर बंदचा तिसरा दिवसही कडक; गुन्हेगारीविरोधात जनआक्रोश, आज भव्य मोर्चा

आकाश दुबैय्या हत्या प्रकरणानंतर 'मकोका' कारवाईची मागणी तीव्र; शाळा-महाविद्यालये बंद, पोलिस अंमलदार निलंबित तर बेग टोळीविरुद्ध धडक कारवाई
Shrirampur Crime Protest
Shrirampur Crime ProtestPudhari
Published on
Updated on

श्रीरामपूर: गुन्हेगारीविरोधात काल मंगळवारी तिसऱ्या दिवशीही येथील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळला असून यासाठी व्यापाऱ्यांसह शाळा, महाविद्यालयेही पुढे सरसावली आहेत. शहराबरोबरच तालुक्यातील बेलापूर, टाकळीभान यांच्यासह मोठी गावेही या आंदोलनात उतरले आहे. त्यामुळे गुन्हेगारीचे जग उद्ध्वस्त करण्यासाठी, श्रीरामपूरकरांचा निर्धार कायम असून काल बंदच्या तिसऱ्या दिवशी शहरातील तब्बल हजारो विद्यार्थी शाळा आणि महाविद्यालयामध्ये गेले नव्हते. हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैय्या यांच्या हत्येनंतर गुन्हेगारी विरोधात संपूर्ण तालुकाच एकटवला आहे.

Shrirampur Crime Protest
Karjat Road Potholes: कर्जतचा दोन कोटींचा मुख्य रस्ता खड्ड्यांत; निकृष्ट कामामुळे ठेकेदारावर कारवाईची मागणी

गुन्हेगारी विश्वाशी संबंधित असलेल्या टोळ्यांवर 'मकोका'ची मागणी करत, अवैध धंद्यांची ठिकाण कायमची बंद करण्याची मागणी श्रीरामपूरकरांना लावून धरली आहे. गेल्या तीन दिवसांपासून श्रीरामपूरकर या मागणीवर ठाम असल्याने, पोलिस प्रशासनाची चांगलीच कोंडी झाली आहे. या मागणीला आता आणखी धार चढली असून शहरातील शाळा महाविद्यालये कालपासून बंदमध्ये सहभागी झाल्या आहेत. या आंदोलनाला सर्वसामान्य नागरी, व्यापारी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून आंदोलनाची धार कायम आहे. या आंदोलनात आता सर्वपक्षीय राजकीय स्थानिक नेत्यांनी सहभाग नोंदवला आहे. त्यामुळे आंदोलनाची धार आणखी तीव्र झाली आहे.

Shrirampur Crime Protest
Ahilyanagar Chain Snatcher Arrested: अहिल्यानगरमध्ये चैनस्नॅचर जेरबंद; १६ गुन्ह्यांतील सराईत आरोपीला कोथरूडमधून अटक

शाळा आणि महाविद्यालये बंद

श्रीरामपूरमधील गुन्हेगारी कायमस्वरूपी नष्ट करण्यासाठी काल शहरातील सरकारी, खासगी शाळा आणि महाविद्यालये बंद असल्यामुळे शहरात शुकशुकाट होता. पोलिसांनी चौकाचौकात बंदोबस्त ठेवला असून यासाठी नगर येथून पोलिसांची जादा कुमकही मागवली आहे. तरीही शहरात शांततेत बंद सुरू आहे.

आज मोर्चा

श्रीरामपूरमधील गुन्हेगारी विश्व चर्चेत आले. गुन्हेगारांना, अवैध धंद्यांना पोसणाऱ्या मास्टर माइंडविरोधात मकोका अंतर्गत कारवाईच्या मागणीसाठी सर्वपक्षीय नेते व नागरिकांच्या वतीने आज बुधवारी मोर्चा काढणार आहे. तरी सर्व नागरिकांनी या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Shrirampur Crime Protest
Nevasa Crime: देवगड दर्शनासाठी गेलेल्या अंगणवाडी सेविकेचे अपहरण; कारमध्ये दिवसभर ओलीस ठेवून मारहाण, लूट

पोलिस अंमलदार शंकर चौधरी निलंबित

श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढल्याचे दिसून येते. त्या पार्श्वभूमीवर एक सराईत गुन्हेगारांच्या संपर्कात असल्याचा आरोप असलेले पोलिस अंमलदार शंकर चौधरी याला पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी निलंबित केले. चौधरी हे पोलिस मुख्यालयात कार्यरत होते. यापूर्वी ते अप्पर पोलिस अधीक्षक श्रीरामपूर कार्यालयात नेमणुकीस होते. गुटखा तस्कारांशी संबंध असल्याचा आरोप झाले होते. त्यामुळे तत्कालीन पोलिस अधीक्षकांनी मुख्यालयात बदली केली होती. त्यानंतरही तक्रारी कायम राहिल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे समजते. काही स्थानिक लोकप्रतिनिधींनी पोलिसांवर गंभीर आरोप केले होते.

बेग टोळीविरुद्ध कारवाईचे सत्र सुरूच

शहरातील सरस्वती कॉलनी, वॉर्ड नं. ७, छाजेड अपार्टमेंट मधील पहील्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये पोलिसांनी छापा टाकून एक देशी बनावटीचे पिस्टल, दोन जिवंत काडतुसे, एका महिलेची हॉस्पीटलची फाईल, यु सेवा टिन मेकर्स, असा एकूण २७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी बेग टोळीविरुद्ध कारवाईची धडक मोहीम सुरू केली आहे.

Shrirampur Crime Protest
Sant Nivruttinath Palkhi: नगर मार्केट यार्डातून संत निवृत्तीनाथ पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; वारकऱ्यांच्या सेवेत हमाल पंचायतीचा आदर्श

शहर पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक हंडाळ यांना पोलिस पथकासह जलद प्रतिसाद पथकाने सफर नमूद ठिकाणी गेले असता सदरचे घर हे छाजेड अपार्टमेंट सरस्वती कॉलनी, वॉर्ड नं.७, श्रीरामपूर येथील पहील्या मजल्यावर असल्याचे समजले. सदर घराला बाहेरुन कडी लावलेली होती. त्यामुळे पथकाने चौकशी केली असता सदर फ्लॅट अक्षय संजय छाजेड यांचा असल्याचे समजले. त्यांना घटनास्थळी बोलावुन विचारपुस केली असता त्यांनी सांगितले की, सदरचा फ्लॅट त्यांनी तालुक्यातील पढेगाव येथील शिवांजय बाळासाहेब उंडे, (वय २०) यास भाडे करारावर दिलेला आहे. सदर फ्लॅट हा शिवांजय उंडे, त्याची बहीण व दाजी सोनु बेग हे वापरत असल्याचे कळाले.

पोलिसांनी सदर फ्लॅटची झडती घेतली असता त्यादरम्यान एक देशी बनावटचे पिस्टल, दोन जिवंत काडतुसे, एका महिलेची हॉस्पीटलची फाईल, यु सेवा टिन मेकर्स या दुकाणाचे सोनुभाऊ असे नाव लिहलेले मोटारीचे बिल, कोरे चेकबुक व वसंत कारभारी पवार यांचे नावाचे एटीएम कार्ड, असा एकुण २७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यावेळी पोलिसांनी शिवांजय बाळासाहेब उंडे, सोनु उर्फ जयप्रकाश अशोक बेग व एका महिलेसह तिघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी शिवांजय बाळासाहेब उंडे, सोनु उर्फ जयप्रकाश अशोक बेग व एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास शहर पोलिस करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news