

कोपरगाव/शिर्डी: पुण्यातून अपहरण करत तरुणाला उत्तर प्रदेशाकडे घेवून जाणाऱ्या भरधाव कारला शिर्डीजवळ अडवत महामार्ग (हायवे) पोलिसांनी त्याची सुखरूप सुटका केली. तीन किलोमीटर पाठलाग करत पोलिसांनी अडवलेल्या कारमधील सहा जणांना ताब्यात घेत पुणे पोलिसांच्या स्वाधीन केले.
अर्शद शकील अहमद सिद्दिकी (वय २४) असे सुखरूप सुटका झालेल्या तरुणाचे नाव आहे. मोहम्मद अन्वर सिद्दिकी (३९), निजामुद्दीन सिद्दिकी (४१), फाजिल हुसेन सिद्दिकी (२३), मोहम्मद साहिल सिद्दिकी (२१), मोहम्मद सिद्दिकी इमामुद्दीन सिद्दिकी आणि सायना खातून सिद्दिकी (२६, सर्व रा. उत्तरप्रदेश) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सहा जणांची नावे आहेत.
पुण्याच्या चिखली भागातून २४ वर्षीय तरुणाचे अपहरण करून समृध्दी महामार्मागावरून कारने उत्तर प्रदेशकडे जात असल्याची माहिती समृध्दी महामार्गाच्या नियंत्रण कक्षाला मिळाली. होती. दरम्यान, तरुणाचे अपहरण कशासाठी केले, कोणाकोणाचा त्यात सहभाग आहे, याची चौकशी पिंपरी चिंचवड पोलिस करणार असल्याचे सांगण्यात आले.