Ahilyangar Honeytrap Robbery Case: हनिट्रॅपद्वारे लुटीचा प्रकार उघड; पाच आरोपी अटकेत

प्रेमाच्या जाळ्यात ओढून लूट; पोलिसांच्या तपासात गुन्ह्याचा पर्दाफाश
Honeytrap
Honeytrap Pudhari
Published on
Updated on

नगर: प्रेमाचा बहाणा करत हनिट्रॅपच्या जाळ्यात ओढले. ‌‘ती‌’च्या गोडीगुलाबीला भुलून तोही थेट भेटीसाठी बारदरी येथे पोहचला. तेथे त्या दोघींनी मित्रांच्या मदतीने त्याला लुटले. फिर्यादीने बदनामीपोटी रस्ता लुटीची तक्रार दिली, पण याच रस्ता लुटीचा तपास करत असताना पोलिसांना या हनीट्रॅपचा उलगडा झाला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन तरुणींसह तिघांना अटक करत 2 लाख 88 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

Honeytrap
Ahilyanagar Leopard Safari Project: निझर्णेश्वर परिसरात दुधेश्वर व गोरक्षगड येथे बिबट सफारी प्रकल्प

शुभम शहादेव बडे (रा. वाणीनगर, सावेडी), सोहेल पापाभाई सय्यद (रा. देवटाकळी, शेवगाव), अशपाक नासिर पठाण (वय रा. यशवंतनगर,भिंगार), वैष्णवी राजेंद्र उनवने (रा. भगवान बाबा चौक,अहिल्यानगर), रुपाली गजानन बनकर (रा. एमआयडीसी, अहिल्यानगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सोने खरेदी करणारा सराफ सुरज प्रदीप शहाणे (रा. शास्त्रीनगर, केडगाव) यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, फिर्यादी 24 जानेवारी 2026 रोजी दुपारी बारदरी (ता.अहिल्यानगर) गर्भगिरी फाटा येथे लघुशंकेसाठी रस्त्याचे कडेला थांबले असता मोटरसायकलावरुन आलेल्या तिघा अनोळखींनी गळ्याला कोयता लावून बळजबरीने सोने-चांदीचे दागिने रोकड लुटली, अशी तक्रार पोलिसां दिली. त्यानुसार तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Honeytrap
Ahilyanagar Development Ajit Pawar: अजितदादांमुळे अहिल्यानगरला सर्वाधिक निधी; विकासकामांतून शहराचे रूप पालटले – आ. काशिनाथ दाते

गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना गुन्ह्याचा समांतर तपास करून, गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले. त्यानुसार कबाडी यांनी सहायक पोलिस निरीक्षक हरिष भोये, पोलिस अंमलदार दीपक घाटकर, भिमराज खर्से, राहुल डोके, प्रशांत राठोड, अमृत आढाव, योगेश कर्डिले, सोनल भागवत, चालक उत्तरेश्वर मोराळे यांचे पथक तयार करून आरोपींच्या शोधाकामी रवाना केले.

पोलिस पथकाने घटनास्थळी जावून पाहणी करून गोपनीय माहिती घेतली. वरील गुन्हा संशयित शुभम बडे याने त्याच्या साथीदारांसह केला असून तो सध्या तपोवन रोड येथे दुचाकीवर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने तपोवन रोड येथे सापळा लावून शुभम बडे याच्यासह अन्य साथीदारांना ताब्यात घेतले. शुभम बडे याने अन्य दोन मैत्रिणीच्या साथीने गुन्हा केल्याची कबुली दिली.

Honeytrap
Ahilyanagar SSC: दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी जिल्हा प्रशासन सज्ज; सीसीटीव्ही, झूम ॲप व पोलिस बंदोबस्त

पोलिस पथकाने संशयित वैष्णवी उणवने, रुपाली बनकर यांना ताब्यात घेतले. त्यांनी चोरीचे दागिने सराफाला विक्री केल्याचे सांगितले. पोलिसांनी सराफालाही ताब्यात घेतले. पोलिसांनी सोने दागिनेसह दुचाकी, मोबाईल, लोखंडी कोयता असा दोन लाख 88 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ताब्यातील आरोपींना नगर तालुका पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.

आरोपी सराईत गुन्हेगार

जबरी चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेला शुभम बडे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तसेच अश्पाक पठाण हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरोधात भिंगार पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत.

चोरीचे दागिन्याची विक्री

चोरीच्या दागिन्याबाबत चौकशी करता ते सराफ सुरज शहाणे यांना विक्री केल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिस पथकाने सराफ सुरज शहाणे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चोरीच्या दागिन्यांची चौकशी केली असता सुरूवातील उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसी खाक्या दाखविताच मुद्देमाल काढून दिला.

Honeytrap
Ahmednagar Collector Office: अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ईमेलवर पुन्हा बॉम्ब धमकी, यंत्रणा सतर्क

अनेकांना गंडवल्याचा संशय

आरोपींनी फिर्यादीला बारदरी येथे फोन करून बोलून घेतले अन्‌‍ गळ्याला चाकू लावून लुटले. आरोपींनी यापूर्वीही असे पाच ते सहा प्रकार केल्याचे चौकशीत समोर आले आहे. परंतु, इज्जतीचा पंचनामा नको म्हणून कोणीही तक्रार केली नाही. या गुन्ह्यात पोलिसांच्या सजग तपासामुळे हा प्रकार समोर आला.

हनिट्रॅप अन्‌‍ गोवा ट्रिप

आरोपींनी हनिट्रॅप करून लुट केल्यानंतर थेट गोवा गाठला. गोव्याच्या बिचवर चांगली मज्जा केली. मात्र, पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला असता ते गोव्यात असल्याची माहिती मिळाली. मौजमजा करून ते नगरमध्ये येताच एलसीबीच्या पोलिसांनी झडप घालून त्यांच्या मुसक्या आवळल्या.

एलसीबीच्या पथकाने जबरीच्या गुन्ह्यात तीन आरोपींना अटक केली. चौकशीत हनिट्रॅपसारखा गंभीर प्रकार समोर आला आहे. त्यामुळे अन्य तीन आरोपी हाती लागले आहेत. याच आरोपींनी आणखी काही जणांची फसवणूक केल्याची शक्यता आहे. कोणाची फसवणूक झाली असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा.

किरणकुमार कबाडी, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news