Ahilyanagar Ganesh Idols: नगरच्या गणेशमूर्तींची परदेशातही क्रेझ; गुजरात, तेलंगणासह कर्नाटकातून मोठी मागणी

शाडू मातीच्या, पर्यावरणपूरक मूर्तींना यंदा पसंती; महागाईमुळे निर्मिती खर्च ४० ते ५० टक्क्यांनी वाढला
Ganesh Idols
Ganesh IdolsPudhari
Published on
Updated on

डाॅ. सूर्यकांत वरकड

नगर: गणेशोत्सव चार दिवसांवर आला असताना शहरातील गणेशमूर्ती कारखान्यांमध्ये दिवस-रात्र कामे सुरू आहेत. नगरमध्ये तयार होणाऱ्या आकर्षक, सुटसुटीत व पर्यावरणपूरक गणेशमूर्तींना केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे; तर गुजरात, तेलंगणा, कर्नाटक राज्यांतून मोठी मागणी आहे. विदेशातही नगरच्या गणेशमूर्तीची क्रेझ आहे. स्थानिक कलाकारांच्या कौशल्यामुळे अहिल्यानगरच्या हस्तकलेचा डंका सातासमुद्रापार गेला आहे. महागाईचा मूर्ती कलेला फटका बसला आहे. कच्च्या मालासह वाहतुकीचा खर्च वाढल्याने सुमारे ४० ते ५० टक्क्यांनी खर्च वाढला आहे. दुष्काळामुळे गणेश भक्तांमध्ये निरुउत्साह दिसून येत आहे.

Ganesh Idols
Karjat Sugarcane Crop: कर्जत तालुक्यात उसावर पायरिला-तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव; उत्पादन घटण्याची भीती

अहिल्यानगरमध्ये गणेशमूर्ती बनविणारे कारखाने मोठ्या प्रमाणात आहेत. शहरातील कलाकारांची तिसरी पिढी आज गणेशमूर्ती तयार करीत आहेत. यंदा शाडूच्या मातीला अन् इको-फ्रेंडली मूर्तींना पसंती, गेल्या काही वर्षांत जगभरात वाढलेली पर्यावरणाची जनजागृती लक्षात घेता, नगरच्या मूर्तिकारांनी 'शाडू मातीची मूर्ती' आणि नैसर्गिक रंगांच्या वापरावर भर दिला आहे.

Ganesh Idols
Ahilyanagar Festival Shopping: पोळा-गणेशोत्सवावर महागाई आणि दुष्काळाचे सावट; नगरच्या बाजारपेठेत ग्राहकांची पाठ

त्याच बरोबर पारंपरिक आकर्षक गणेशमूर्ती तयार केल्या आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून गणपती कारखान्यामध्ये दिवसरात्र काम सुरू आहे. नगरमधील गणेशमूर्तींना गुजरात, तेलंगणा, कर्नाटक, गोवा राज्यांसह मुंबई, संभाजीनगर, नाशिक, नागपूर या शहरांमध्ये सर्वाधिक मागणी आहे. गणेशोत्सव चार दिवसांवर आला असताना मूर्तीकार मूर्तीवर शेवटची कलाकुसर करीत आहेत.

Ganesh Idols
Ahilyanagar PGI Report 2025-26: पीजीआय अहवालात अहिल्यानगरची कामगिरी संमिश्र; राज्य क्रमवारीत पाचव्या क्रमांकावरून १४ वर घसरण

कारखान्यांमुळे महिलांना रोजगारांची संधी

शहरातील गणपती कारखान्यात पुरूषांसह महिलांनाही रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. या ठिकाणी १५ महिला गणेशमूर्ती बनविण्याचे काम करीत आहे. मूर्ती निर्मितीच्या विविध टप्प्यांमध्ये - जसे की रंगकाम, अलंकार सजावट, नक्षीकाम, थर देणे - या सर्व प्रक्रियांमध्ये महिलांचा मोठा सहभाग आहे. त्यामुळे अनेक महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होण्याचा मार्ग उपलब्ध झाला आहे.

नावीन्यपूर्ण गणेशमूर्तींची क्रेझ

गणेशोत्सवामध्ये लालबागचा राजा, सिद्धीविनायकाच्या रूपातील गणेश मूर्तीना मागणी आहेच; त्याचबरोबर स्वामी समर्थ, वारकरी, प्रभू श्रीराम, नवनाथ आदींच्या रूपातील गणेशमूर्तींची चांगलीच क्रेझ आहे. गणेशभक्त यंदा वेगवेगळ्यातील रूपांतील गणेशमूतींच्या शोधात आहेत. तसेच वस्त्र परिधान केलेल्या गणेश मूर्तींनाही चांगलीच मागणी आहे.

Ganesh Idols
Pathardi Cable Theft: पाथर्डीत शेतीपंपांच्या केबल चोरीचा धुमाकूळ; आमदार मोनिका राजळे यांच्या शेतातही चोरी

गणेशोत्सव चार दिवसांवर येऊन ठेपला असला तरी दुष्काळाचे सावट दिसत आहे. ग्राहकांमध्ये निरुउत्साह दिसून येत आहे. दुसऱ्या बाजूला डिझेल-पेट्रोल महागल्याने वाहतुकीचा खर्च वाढला आहे. दुसरीकडे मजुरी, कच्चा माल व कलरच्या किमतीही ३० ते ४० टक्क्यांनी वाढल्या आहेत. परिणामी गणेशमूर्तींच्याही किमतीही ३० टक्क्यांनी वाढल्या आहेत.

नंदकिशोर रोकडे, मूर्तिकार

आमची तिसरी पिढी पूर्णवेळ गणेशमूर्ती कारखान्यात काम करीत आहे. गणेशमूर्तींना हैदराबाद, गुजरात राज्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये मागणी आहे. यंदा महागाईमुळे कच्च्या मालाच्या किमतीमध्ये ३० ते ४० टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे गणेशमूर्तींच्या किमतीतही वाढ झाली आहे. शंभर रुपयांपासून पंधरा हजारांपर्यंत मूर्ती आहेत.

विनायक सुसरे, मूर्तिकार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news