Kolhar Warehouse Fire: फटाक्यामुळे भांड्यांच्या गोदामाला भीषण आग; लाखोंचे साहित्य जळून खाक

कोल्हारमध्ये अग्नितांडव; दोन तासांच्या प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाला आग विझविण्यात यश, सुदैवाने जीवितहानी टळली
Kolhar Warehouse Fire
Kolhar Warehouse FirePudhari
Published on: 
Updated on: 

कोल्हार: फटाक्यामुळे लागलेल्या आगीत येथील कैलास पांडुरंग कोळपकर यांच्या मालकीच्या भांड्याच्या गोदामाला काल सोमवारी (दि.९) सायंकाळी भीषण आग लागली. या आगीत गोदामातील लाखो रुपयांची भांडी आणि इतर शेतीपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. अग्निशमन दलाच्या दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

Kolhar Warehouse Fire
Shevgaon School Teacher Sleeping: शाळेच्या वेळेतच शिक्षक झोपेत! शेवगाव तालुक्यातील ढोरसडे प्राथमिक शाळेतील प्रकाराने खळबळ

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, काल (दि.९) सायंकाळी ६:४५ वाजेच्या सुमारास कैलास पांडुरंग कोळपकर यांच्या मालकीच्या भांडी गोदामाला फटाक्यामुळे अचानक आग लागली. या गोदामामध्ये भांड्यांसोबतच ताडपत्री, शेडनेट आणि मुरघास बॅगा, अशा विविध साहित्याचा मोठ्या प्रमाणावर साठा होता.

Kolhar Warehouse Fire
Nagar Livestock Fodder Crisis: नगर तालुक्यात दुष्काळाचे पशुधनावर संकट! अडीच लाख जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर

या ज्वलनशील साहित्यामुळे आगीने अल्पावधीतच रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.आगीने भीषण रूप घेतल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. सदर घटनेची माहिती मिळताच प्रवरा सहकारी साखर कारखाना आणि राहाता नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या बंबांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

Kolhar Warehouse Fire
Pravara River Illegal Dams: प्रवरा नदीतील १९ अनधिकृत बंधारे हटवा; अन्यथा दिवाळीत तीव्र आंदोलनाचा इशारा

जवानांनी पाण्याचा मारा करत आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, आग वेगाने पसरल्यामुळे कैलास कोळपकर यांच्या मालकीचे लाखो रुपयांचे साहित्य जळून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.