Ahilyanagar Farmer Tragedy: कर्जाचा वाढता बोजा अन् शेतीचे नुकसान; अहिल्यानगरमध्ये ३७ वर्षीय शेतकरी महिलेने संपवलं आयुष्य

खडकीतील ३७ वर्षीय दीपाली रोकडे यांचा दुर्दैवी अंत; कुटुंबाला तातडीच्या शासकीय मदतीची ग्रामस्थांची मागणी
Ahilyanagar News
Ahilyanagar NewsPudhari
Published on: 
Updated on: 

नगर तालुका: दुष्काळी परिस्थिती, शेतीतून अपेक्षित उत्पन्न नाही, डोक्यावर वाढत गेलेला कर्जाचा बोजा आणि त्यातच आजारपणाच्या उपचारांचा खर्च अशा आर्थिक विवंचनेतून खडकी (ता. अहिल्यानगर) येथील दीपाली प्रकाश रोकडे (वय ३७) या शेतकरी महिलेने घराजवळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना बुधवारी रात्री(दि.२३) घडली.

दीपाली रोकडे यांच्या कुटुंबाकडे अवघी साडेतीन ते चार एकर शेती आहे. शेती आणि मोलमजुरीच्या उत्पन्नावर कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. मात्र, गेल्या काही काळात कुटुंबावरील आर्थिक संकट वाढत गेले.

Ahilyanagar News
Ahilyanagar Ganesh Visarjan Police Action: गणेश विसर्जनासाठी नगर पोलिसांची मोठी कारवाई; रेकॉर्डवरील ६२३ सराईत गुन्हेगार हद्दपार

दोन वर्षांपूर्वी घर बांधण्यासाठी घेतलेले हातउसने स्वरूपातील सुमारे चार ते पाच लाख रुपयांचे कर्ज, त्यानंतर अलाहाबाद बँकेचे सुमारे एक लाख रुपये, सेवा सोसायटीचे सुमारे ४० हजार रुपये तसेच खेळते भांडवल कर्जाचे ३५ हजार रुपये, असा कर्जाचा मोठा बोजा कुटुंबावर असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

त्यातच काही दिवसांपूर्वी दीपाली यांच्यावर आजारपणामुळे उपचार करण्यात आले होते. उपचारासाठी झालेल्या खर्चामुळे कुटुंबाच्या आर्थिक अडचणीत आणखी भर पडली. यंदाच्या खरीप हंगामात पेरणी करूनही पुरेसा पाऊस न झाल्याने शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही.

पुढील काळातही पावसाची परिस्थिती समाधानकारक नसल्याने शेतीतून उत्पन्नाची शक्यता कमी झाली होती. कर्जाचा वाढता बोजा व आजारपणाचा उपचार याला कंटाळून दिपाली रोकडे यांनी आत्महत्या केल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.

Ahilyanagar News
Ahilyanagar Ganesh Visarjan: दीपक वाघस्कर मृत्यूने नगरमध्ये तणाव; २९ तासांनी गणेश विसर्जन, एसआयटी चौकशीसाठी शासनाला अहवाल

दीपाली रोकडे यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी आणि सासू असा परिवार आहे. या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, दोन मुलांच्या डोक्यावरून आईचे छत्र हरपले आहे.

शेतीचे नुकसान, वाढता कर्जबोजा आणि वैद्यकीय खर्च यामुळे अडचणीत आलेल्या कुटुंबांला शासनाकडून तातडीने मदत मिळावी अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तातडीने पहिल्या टप्प्यात मदत द्यावी. पीक नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून नुकसानभरपाई द्यावी. तसेच कर्जाबाबत दिलासा आणि आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकरी कुटुंबांना तातडीची आर्थिक मदत मिळावी. शासनाची मदत केवळ कागदावर न राहता ती प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचली पाहिजे.

- संदेश कार्ले, माजी जिल्हा परिषद सदस्य

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news