Ahilyanagar Drought: अहिल्यानगरमध्ये दुष्काळावरून सरकारला घेरणार; शशिकांत शिंदेंचा तीव्र आंदोलनाचा इशारा

टँकर आणि जनावरांच्या चाऱ्याचा पुरवठा अपुरा असल्याचा आरोप; शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची मागणी
Shashikant Shinde
Shashikant ShindePudhari
Published on: 
Updated on: 

नगर: दुष्काळी परिस्थितीत अहिल्यानगर जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचे टँकर आणि जनावरांचा चारा पुरविण्यात शासन अपयशी ठरल्याचे दिसत आहे. शासनाने शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, अन्यथा जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी रविवारी दिला.

Shashikant Shinde
Radhakrishna Vikhe Patil: राहुल गांधींना भाजपचा इशारा; लोकशाही मान्य नसेल तर जशास तसे उत्तर देऊ

दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी शिंदे रविवारी (दि. २२) जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यांनी जेऊरसह परिसरातील दुष्काळी भागाची पाहणी केली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. खा. नीलेश लंके, जिल्हाध्यक्ष सीताराम काकडे, संदीप वर्पे आणि पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. शिंदे यांनी या दौऱ्यात शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या. त्यांच्यासमवेत शेतातच बसून जेवणही केले.

Shashikant Shinde
Ahilyanagar Delimitation: डिलिमिटेशनमुळे अहिल्यानगरचे राजकीय गणित बदलणार; लोकसभेची एक, विधानसभेच्या सहा जागा वाढण्याची शक्यता

शिंदे म्हणाले, की दुष्काळ निवारणात सरकार कमी पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना संतप्त आहेत. सरकारने दुष्काळाचे गांभीर्य लक्षात घेता पाच हजारांपेक्षा जास्त मदत देण्याची गरज आहे. याशिवाय, किमान एक वर्षे शेतकऱ्यांचा संसार उभा राहील, अशी भरीव मदत करण्याचे दातृत्व सरकारने दाखवायला हवे, असेही त्यांनी स्पष्ट केले. शासनाने शेतकऱ्यांना चारा देतो, टँकर देतो सांगितले.

Shashikant Shinde
Ahilyanagar Municipal Corporation Recruitment: अहिल्यानगर महापालिकेतील ४५ पदांची भरती रखडली; टीसीएसला बदलण्याच्या हालचाली

मात्र अजून काही भागात चाऱ्याचा पत्ता नाही. टँकर एक दिवसाआड सुरू असल्याचेही मला सांगण्यात आले. सरकार दिलेली आश्वासने पाळत नाही. प्रशासनाला आवश्यक अर्थसहाय्य पोहचले नसावे किंवा सरकार अपयशी ठरल्याची टीकाही त्यांनी केली. शेतकऱ्यांचा सरकारवरील विश्वास उडाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी नगरमध्ये मोठे आंदोलन उभे करू, असा इशाराही शिंदे यांनी दिला.

Shashikant Shinde
Ahilyanagar Dial 112: अहिल्यानगरमध्ये डायल ११२ ला नागरिकांचा मोठा प्रतिसाद; दहा महिन्यांत ७८ हजार कॉल

‘स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये यश मिळेल’

दरम्यान, जिल्हा बँकेच्या नूतन संचालकपदी निवडून आल्याबद्दल खा. नीलेश लंके यांचा प्रदेशाध्यक्ष शिंदे यांनी सहकार सभागृहात सत्कार केला. यावेळी लंके हे संघर्षातून उभे राहिलेले नेतृत्व आहे, असे सांगून शिंदे म्हणाले, जनतेने साथ दिल्यास येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही पक्षाला जिल्ह्यात मोठे यश मिळेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.