

गोरक्ष शेजूळ
नगर: सहकार कायद्यातील प्रस्तावित बदलाच्या धास्तीने सौभाग्यवतीला पुढे करत त्यांच्या नावाने जिल्हा बँकेला ठराव दिले. राज्य सरकारच्या हस्तक्षेपानंतर त्या नव्या तरतुदीला ब्रेक लागला. हीच नामी संधी साधत सुरूवातीला रिर्व्हस टाकणारे दिग्गज आता अचानक रेसमध्ये आले आहेत. या दिग्गांजामध्ये जिल्हा र्बंकेचे माजी अध्यक्ष सीताराम पाटील गायकर, चंद्रशेखर घुले पाटील यांच्यासह अंबादास पिसाळ यांचा समावेश आहे.
जिल्हा बँकेसाठी ठराव होत असताना सहकार कायद्यातील नव्या तरतुदीनुसार सलग तिसऱ्यांना निवडणूक लढवण्यास अडचण होण्याची शक्यता गृहीत धरून चंद्रशेखर घुले, सीताराम गायकर, अंबादास पिसाळ यांनी स्वत:च्या नावाऐवजी पत्नीच्या नावे ठराव करून घेतले. ते पाठवलेही. त्यानंतर ती अट रद्द करण्याचा निर्णय झाला. शिवाय उमेदवारी अर्ज भरेपर्यंत ठरावात बदल करण्याची संधीही उपलब्ध झाली.
हीच नामी संधी साधत पत्नीच्या नावे पूर्वी ठराव बदलण्याचा निर्णय मिस्टरांनी घेतला. ठराव बदलत सौंच्या सभासदत्वाचा राजीनामा घेऊन त्या ठिकाणी नव्याने स्वत:च्या नावाचा ठराव करुन घेतले. सुरूवातील रिर्व्हस टाकणारे घुले, गायकर व पिसाळ यांची नावे मतदार यादीत समाविष्ट झाल्याने तेही रेसमध्ये आल्याचे समोर आले.
आमदार लंघेंच्या मिसेस शेतीपूरकमधून
शेतीपूरक मतदारसंघातून आमदार विठ्ठलरा लंघे यांच्या पत्नी रत्नमाला यांच्या नावाचा ठराव घेण्यात आला आहे. नेवाशातून सोसायटी मतदासंघावर माजी मंत्री शंकरराव गडाखांचा प्रभाव पाहता लंघे यांनी शेतीपुरकला प्राधान्य दिल्याचे समोर येत आहे. संगमनेरातून रामहरी कातोरे यांचेही नाव आले आहे. अहिल्यानगरच्या निबंळक सोसायटीतून माधवराव लामखडे यांचा ठराव वगळल्याचेही पुढे येत आहे.
अकोले : मोग्रस सोसायटीतून बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम गायकर यांनी पत्नी भामाबाई यांच्या ऐवजी स्वतःच्या नावाचा ठराव
शेवगाव : खानापूर सोसायटीतून महेश थोरात यांच्या नावाचा ठराव होता. थोरात यांचा राजीनामा घेत तो रद्द करण्यात आला. नवा ठराव बँकेचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर घुले पाटील यांच्या नावाने करण्यात आला.
कर्जत : लोकनेते रामभाऊ बाबुराव धांडे सोसायटीतून सुनंदा अंबादास पिसाळ यांचा ठराव होता. तो रद्द करून त्याऐवजी अंबादास पिसाळ यांनी स्वतःचा ठराव करून घेतला.