Firing Case: गणपती आणताना तरुणांवर फायरिंग; जीवघेण्या हल्ल्यातील आरोपी २४ तासांत जेरबंद

कार अंगावर घालून गावठी पिस्तुलातून गोळीबार; एलसीबीच्या पथकाची शिरूरमध्ये कारवाई
Belwandi Firing Case
Belwandi Firing CasePudhari
Published on
Updated on

नगर: गणपती आणण्यासाठी गेलेल्या तरुणांवर कार अंगावर घालून गावठी पिस्तुलातून फायरिंग करीत जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांत मुसक्या आवळल्या. ओम दीपक भोंडे (वय २१, रा. अण्णापूर, हल्ली रा. बाबुरावनगर, शिरूर, जि. पुणे) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.

Belwandi Firing Case
Ahilyanagar Stray Dog: अहिल्यानगरमध्ये भटक्या श्वानांचा धुमाकूळ; पाच वर्षांत ३.२६ लाख नागरिकांना चावा

१४ सप्टेंबर २०२६ रोजी फिर्यादी प्रशांत संदीप वाबळे (वय २१, रा. म्हसे, ता. पारनेर) हे मित्रासह शिरूर येथून गणपती घेऊन घरी येत असताना गव्हाणवाडी ते शिरूर जाणारे घोडनदीवरील पुलाजवळ थांबले होते. त्यावेळी आरोपींनी त्यांच्याकडील कार फिर्यादी व त्यांच्या मित्राच्या अंगावर घालून, किशोर शिंदे याने गावठी पिस्तुलातून वाबळे यांच्यावर फायरिंग करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Belwandi Firing Case
Manoj Jarange Patil: जरांगे पाटील आज श्रीगोंद्यात; पोलिसांचा मोठा बंदोबस्त, चार ठिकाणी पार्किंगची व्यवस्था

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाचे आदेश दिले. एलसीबीचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनंत सालगुडे व कर्मचाऱ्यांची दोन पथके आरोपीच्या शोधाकामी रवाना केली होती.

Belwandi Firing Case
Ahilyanagar Water Shortage: पावसाने दडी मारताच अहिल्यानगरमध्ये पाणीटंचाई; ११४ टँकरने २.२० लाख नागरिकांना पाणी

तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे १५ सप्टेंबर रोजी आरोपी ओम भोंडे हा बाबुरावनगर, शिरूर येथे लपून बसल्याची माहिती मिळाली. पथकाने तात्काळ शिरूर येथे सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी आरोपीला बेलवंडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news