Ahilyanagar Child Marriage Prevention: अक्षयतृतीयेच्या पार्श्वभूमीवर बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन सतर्क

बालविवाह रोखण्यासाठी यंत्रणांना सूचना; माहिती मिळताच 1098 किंवा 112 वर कळविण्याचे आवाहन
Child Marriage
Child MarriagePudhari
Published on
Updated on

नगर: अक्षयतृतीयेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात बालविवाह होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने विशेष सतर्कता बाळगण्यास सुरुवात केली आहे. कुठेही बालविवाह होऊ नयेत यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून आवश्यक ती कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले.

Child Marriage
Ahilyanagar School Timing Change: अहिल्यानगर जिल्ह्यात शाळांच्या वेळेत बदल; उष्णतेच्या लाटेमुळे प्रशासनाचा निर्णय

अक्षयतृतीया हा सण विवाहासाठी शुभ मानला जात असल्याने या दिवशी सामूहिक तसेच एकल विवाह सोहळ्यांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन केले जाते. या पार्श्वभूमीवर बालविवाह होण्याची शक्यता लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Child Marriage
Ashok Kharat: भोंदू अशोक खरातच्या आर्थिक साम्राज्याचा विस्तार; 60 एकर जमिनीचा धक्कादायक खुलासा

शासनाच्या अधिसूचनेनुसार ग्रामीण भागात ग्रामसेवकांची बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, अंगणवाडी सेविका सहाय्यक अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. शहरी भागात बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी) यांना प्रतिबंध अधिकारी, तर मुख्य सेविकांना सहाय्यक अधिकारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Child Marriage
Abhishek Kalmkar Case: माजी महापौर अभिषेक कळमकर याच्याविरुद्ध स्टँडिंग वॉरंट; न्यायालयाचे आदेश

संबंधित यंत्रणांनी अशा ठिकाणी विशेष लक्ष ठेवून आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. अक्षयतृतीया तसेच वर्षभर कुठेही बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास तात्काळ चाइल्ड हेल्पलाईन 1098 किंवा पोलिस हेल्पलाईन 112 या टोल-फ्री क्रमांकावर कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अहिल्यानगर जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहकार्य करावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी केले आहे.

Child Marriage
Sangamner Illegal Garbage Dumping: संगमनेरमध्ये शांती घाट परिसरात कचरा व राडारोड्यामुळे नागरिक त्रस्त

बालविवाहाला उपस्थित सर्वांवर गुन्हा

बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 नुसार मुलांचे किमान वय 21 वर्षे, तर मुलींचे किमान वय 18 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. या वयोमर्यादेपेक्षा कमी वयात विवाह केल्यास तो बालविवाह ठरून बेकायदेशीर मानला जातो. अशा प्रकरणांमध्ये संबंधित पालक, नातेवाईक, आयोजक तसेच विवाह सोहळ्यात सहभागी असलेल्या सर्व संबंधितांवर गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. या गुन्ह्यासाठी दंड व कारावासाची तरतूद आहे.

सहकार्य न करण्याचे आवाहन

बालविवाह रोखण्यासाठी मंदिरे, मशिदी, चर्च, गुरुद्वारे, मंगल कार्यालये, बँडपथके, डीजे, केटरर्स, फोटोग्राफर तसेच विवाह विधी करणारे धर्मगुरूंनी बालविवाहास कोणत्याही प्रकारे सहकार्य करू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news