Advocate Riyaz Pathan Case: ॲड. रियाज पठाण हत्या प्रकरणात सात जणांना मरेपर्यंत जन्मठेप!

अण्णा लष्करे खून खटल्यातील कथित फितुरीचा राग; १३ वर्षांनंतर जिल्हा सत्र न्यायालयाचा मोठा निकाल, पाच आरोपी निर्दोष
Law
LawPudhari
Published on
Updated on

नगर: वाळूतस्कर अण्णा लष्करे खून खटल्यात कथितरित्या फितूर झालेले ॲड. रियाज पठाण यांच्या खुनाच्या गुन्ह्यात न्यायालयाने सात जणांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. प्रवीण पोपट खरचंद, मोहन सुरेश लष्करे (फरार), रामेश्वर भगवान गाढे, चौरंगीनाथ गोरक्षनाथ लष्करे, पवन सोमनाथ नरुल्ला, सचिन चंदू चव्हाण, सादिक बशीर शेख अशी त्यांची नावे आहेत. प्रधान व जिल्हा सत्र न्यायाधीश शिवाजी कचरे यांनी शुक्रवारी (दि. २८) हा निकाल दिला. दरण्या, पाच आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.

Law
Nashik Shirdi Railway Land Acquisition: काकोडकर समितीचा अहवाल येण्यापूर्वीच रेल्वे मंत्रालयाची हालचाल; नाशिक रोड-शिर्डी मार्गासाठी भूसंपादन सुरू!

नेवासे तालुक्यातील वाळूतस्कर अण्णा लष्करे याची टोळीयुद्धातून हत्या झाली होती. त्या प्रकरणातील साक्षीपुरावे नोंदविताना १२ डिसेंबर २०१२ रोजी जिल्हा न्यायालयात साक्ष झाली तेव्हा ॲड. रियाज पठाण यांना सरकार पक्षाने कथितरित्या फितूर घोषित केले. त्यामुळे लष्करे टोळीशी संबंधित सदस्यांना राग आला होता. दरम्यान, दि. १६ सप्टेंबर २०१३ रोजी दुपारी उपनिबंधक कार्यालयाच्या आवारात ॲड. पठाण दस्त नोंदविण्यासाठी बसले असताना मोहन लष्करे, रामेश्वर गाढे, चौरंगीनाथ लष्करे यांनी ॲड. पठाण यांचे दोन्ही हात धरले आणि पवन नरुल्ला, सचिन चव्हाण, सादिक शेख हे प्रवीण खरचंद याला गावठी पिस्तुलातून गोळ्या झाडण्यास सांगितले. प्रवीण याने तीन गोळ्या झाडल्या. त्यानंतर आरोपी पळून गेले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन प्रवीण याला पिस्तुलासह ताब्यात घेतले. दरम्यान, उपचारांपूर्वीच ॲड. पठाण यांचा मृत्यू झाला होता.

Law
Kopargaon Stray Cattle: कोपरगावात मोकाट जनावरांचा प्रश्न पेटला; वकिलांकडून पालिकेला कायदेशीर नोटीस

नेवासे पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. या खटल्यात सरकार पक्षातर्फे २९ साक्षीदार तपासण्यात आले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असिफ पठाण आणि असिफ शेख तसेच शवविच्छेदन करणारे डॉ. कैलास झिने यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या.

Law
Kharif Crop Damage: पाथर्डी तालुका दुष्काळाच्या छायेत... पावसाने दडी मारल्याने खरीप पिके गेली

आरोपीच्या वतीने बचावाचे तीन साक्षीदार तपासण्यात आले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची साक्ष, वैद्यकीय पुरावे आणि सरकारी वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य धरून सात जणांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. परिमल फळे यांनी सहाय केले.

Law
Rahuri Leopard Attack: शेतकरी बापलेकाची बिबट्याशी झुंज; राहुरी तालुक्यातील मांजरी शिवारातील घटना, ग्रामस्थ भयभीत

सबळ पुराव्याअभावी पाच जणांची निर्दोष मुक्तता

या खटल्यात पाच आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. अशोक जालिंदर जगताप, सत्यवान धनराज सानकांबळे ऊर्फ लष्करे, विलास पोपट जिरे, सोपान भगवान गाढे, सुनील उर्फ सोन्या मोहन परदेशी यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news