753 Gram Panchayats Administrators: ७५३ ग्रामपंचायतींवरील प्रशासकांचा तिढा सुटला; सरपंचांऐवजी आता शासकीय अधिकारी

शासनाचा मोठा निर्णय; विस्तार अधिकारी, आरोग्य, शिक्षण, पंचायत किंवा अन्य शासकीय अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती होणार
Gram Panchayat Funds
Gram Panchayat FundsPudhari
Published on
Updated on

नगर: गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या जिल्ह्यातील ७५३ ग्रामपंचायती प्रशासक नियुक्तीच्या तिढ्याला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. सरपंचांऐवजी आता शासकीय अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश शासनाने काढले आहेत. त्यामुळे ७५३ ग्रामपंचायतींवर नव्याने प्रशासक नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.

Gram Panchayat Funds
Kanhobachi Wadi ZP School: पाथर्डीतील या शाळेत तीन विद्यार्थी, दोन शिक्षिका; मॅडम येईपर्यंत पालकांचा पहारा

फेब्रुवारी/मार्चमध्ये जिल्ह्यातील ७५३ ग्रामपंचायतींच्या सदस्यांचा कार्यकाल संपला. त्यानंतर सुरुवातीला संबंधित ग्रामपंचायतींचा कारभार विस्ताराधिकाऱ्यांकडे प्रशासक म्हणून सोपविण्यात आला होता. मात्र, या नियुक्तीला सरपंच परिषदेने हरकत घेतली. त्यानंतर शासनाने परिपत्रक काढून मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर सरपंचांना प्रशासक म्हणून नियुक्त करण्याचे आदेश दिले.

Gram Panchayat Funds
Jeur Police Outpost: जेऊरचे पोलिस दूरक्षेत्र ‘नावालाच’; ना इमारत, ना कर्मचारी, ना सुविधा!

शासनाच्या या निर्णयालाही ग्रामस्थांकडून न्यायालयात हरकत याचिका दाखल करण्यात आली. या प्रकरणाची सुनावणी सुरू असतानाच न्यायालयाने सरपंचांना प्रशासक म्हणून कायम ठेवण्यास ग्रीन सिग्नल दिला; मात्र प्रशासक म्हणून काम करताना त्यांचे खर्चाचे अधिकार काढून घेण्यात आले. त्यामुळे प्रशासक असूनही ग्रामपंचायतीच्या विकासकामांसाठी अथवा अन्य बाबींवर खर्च करता येत नसल्याने अनेक गावांमधील गावगाडा ठप्प झाला. दरम्यान, प्रशासकांना खर्चाचे अधिकार मिळावेत यासाठी न्यायालयात सुनावणी सुरू होती.

Gram Panchayat Funds
Karjat Crime: कांदा आणल्याच्या कारणावरून सख्ख्या भावाचा बहिणीवर जीवघेणा हल्ला; कुऱ्हाडीच्या दांड्याने बेदम मारहाण

मात्र, प्रशासक नियुक्तीची सहा महिन्यांची मुदत संपल्याने शासनाने या संपूर्ण प्रकरणाचा पुनर्विचार केला. त्यानंतर आता सरपंचांऐवजी शासकीय अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामविकास विभागाने ८ सप्टेंबर २०२६ रोजी तशी अधिसूचना काढली. ग्रामपंचायतीवर विस्तार अधिकारी (कृषी), विस्तार अधिकारी (आरोग्य), विस्तार अधिकारी (शिक्षण), विस्तार अधिकारी (पंचायत) किंवा अन्य शासकीय अधिकारी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करता येणार आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत किंवा अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून सहा महिन्यांपर्यंत, यापैकी जे आधी होईल तोपर्यंत प्रशासकाचा कार्यकाळ राहणार आहे.

Gram Panchayat Funds
Ahilyanagar Kunbi Caste Verification: अहिल्यानगरमध्ये कुणबी जात पडताळणीला वेग; ३७ हजार ८३४ प्रकरणे निकाली

शासन निर्देशानुसार जिल्ह्यातील ७५३ ग्रामपंचायतींवर शासकीय अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली जाईल. त्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेतली आहे. प्रशासकांची नियुक्ती तातडीने केली जाईल.

आनंद भंडारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news