Ahilyanagar News: पाणलोटात पडणार्‍या पावसाची लाभक्षेत्रात दडी; धरणांत 34 टीएमसी पाणी

गेल्या वर्षीच्या तुलनेत 24 टीएमसी अधिक साठा
Ahilyanagar News
पाणलोटात पडणार्‍या पावसाची लाभक्षेत्रात दडी; धरणांत 34 टीएमसी पाणी
Published on
Updated on

Water Storage in Dams 2025

दीपक ओहोळ

नगर: जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असून, भंडारदरा, निळवंडे, मुळा, आढळा आदी धरणांत आवक सुरू असून, भंडारदरा व निळवंडे धरणांतून विसर्ग सुरू आहे. धरणांत दिवसेंदिवस वाढत असलेली आवक समाधानकारक असली तरी या धरणांच्या लाभक्षेत्रात पावसाने मारलेली दडी चिंताजनक आहे. लहान मोठ्या नऊ धरणांत 34 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध झाला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 23 हजार 987.43 दशलक्ष घनफूट म्हणजेच जवळपास 24 टीएमसी इतका अधिकचा पाणीसाठा आहे.

पावसाळा सुरू झाला की जून महिन्यात जिल्हाभर सर्वदूर पावसाचे आगमन होते. यंदा मे महिन्यात दमदार पावसाने हजेरी लावली. जून महिन्यात पेरणीजोगा पाऊस होईल अशी अपेक्षा होती. परंतु फक्त 80 टक्के म्हणजे सरासरी 74 मिलिमीटर पाऊस झाला. जून महिन्यात 20 टक्के पावसाची तूट झाली. (Latest Ahilyanagar News)

Ahilyanagar News
Local Bodies Election| स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी भाजप सज्ज: डॉ. स्वाधीन गाडेकर

हा पाऊस देखील सर्वत्रच कमी अधिक प्रमाणात झाला. त्यामुळे काही ठिकाणी पेरणी झाली. काही ठिकाणी उशिरा झाली. आजमितीस 75 टक्के पेरणी झाली असून, अद्याप 25 टक्के पेरणी बाकी आहे. आजमितीस 6 जुलैपर्यंत सरासरी 127.1 मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना 67 टक्के म्हणजे फक्त 85.6 मिलिमीटरची नोंद झाली आहे.

अपेक्षित पावसाच्या 33 टक्के पावसाची तूट आहे. पारनेर, संगमनेर व अकोले तालुक्यांत सरासरी इतकी नोंद झाली. मात्र उर्वरित तालुक्यांत अपेक्षित पाऊस नसल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.

गेल्या वर्षी याच कालावधीत जिल्ह्यात दीडशे टक्के म्हणजे 189.9 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे खरीप पेरणी जवळपास शंभर टक्के होऊन पिके चांगली होती. भंडारदरा, निळवंडे, मुळा व इतर धरणांत जूननंतरच आवक सुरू होत होती.

मात्र, यंदा या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जूनपासूनच पावसाचे जोरदार आगमन झाले. त्यामुळे जूनअखेरच भंडारदरा, निळवंडे व मुळा धरणदेखील 60 टक्क्यांपेक्षा अधिक भरले आहे. आढळा धरण नुकतेच ओव्हरफ्लो झाले. भंडारदरा 60 टक्के भरताच प्रवरा नदीपात्रांत विसर्ग सोडण्यात आला आहे.

Ahilyanagar News
Injured Deer Neglected: जखमी हरणावर उपचारास टाळाटाळ; करमनवाडीत वनविभागाची उदासीनता

या पावसामुळे भंडारदरा धरणात 1 जूनपासून 6 हजार 618 दलघफू, निळवंडेत 4 हजार 153, मुळा धरणात 6 हजार 689, आढळा धरणात 549, मांडओहळमध्ये 170, सीना धरणात 947 विसापूर धरणात 443 दलघफू इतक्या पाण्याची आवक झाली आहे.

दिवसेंदिवस वाढत असलेली आवक समाधानकारक ठरत आहे. त्यामुळे 6 जुलै रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत भंडारदरा धरण 70.42 टक्के भरले आहे. निळवंडे धरणात 69.84 तर मुळा धरणात 59.98 टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध झाले आहे.

याशिवाय आढळा धरणात शंभर टक्के, मांडओहळ 80.91 टक्के, सीना शंभर टक्के, खैरी 32 टक्के तर विसापूर धरणात 96 टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध होऊन एकूण नऊ धरणांत 34 हजार 5 दलघफू इतका पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

गेल्या वर्षी याच धरणांत एकूण 10हजार 17 दलघफू इतका पाणीसाठा उपलब्ध होता. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 23 हजार 987.43 दलघफू म्हणजेच जवळपास 24 टीएमसी इतका पाणीसाठा अधिकचा आहे.

पाणलोट क्षेत्रातील पाऊस

1 जूनपासून पाणलोट क्षेत्रातील भंडारदरा पर्जन्यमान केंद्रात 1140 मिलिमीटर, निळवंडे येथे 488, मुळा 178, आढळा 117, मांडओहळ 59, पारगाव 47, ओझर 77, आश्वी 66, रतनवाडी 1915, घाटघर 1881, पांजरे 1245, वाकी 859, कोतूळ 225 मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे.

रविवारचा पाणीसाठा

भंडारदरा : 7774

निळवंडे : 5811

मुळा : 15595

आढळा : 1060

मांडओहळ : 322.84

सीना :2400

खैरी : 171.21

विसापूर : 870.38

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news