

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
औरंगाबाद रोडवर विदेशी मद्याचा ट्रक (एमएच 15, वाय 7272) उलटल्याची घटना घडली. चौकात ही घटना घडल्यामुळे बराच वेळ वाहतूक कोंडी झाली होती. ट्रक औरंगाबादवरून नाशिकमार्गे मुंबईच्या दिशेने जात होता.
मिर्ची हॉटेलजवळील सिग्नलजवळ चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून चालक किरकोळ जखमी झाला आहे. दरम्यान, ट्रकमधील मद्य चोरी होऊ नये, याकरता अपघातस्थळी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी नाशिक-औरंगाबाद रोडवर मद्याचे पाट वाहिल्यासारखी स्थिती झाली होती. तर बाटल्या मोठ्या प्रमाणात फुटल्याने परिसरात मद्याचा वास पसरला होता. 12 तास उलटूनही अपघातग्रस्त ट्रक रस्त्यात पडून असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. परिणामी, पोलिसांना दिवसभर रस्त्यावर खडा पहारा द्यावा लागला.