नाशिक : पुढारी वृत्तसेवा : डाॅ. सुवर्णा वाजे यांच्या क्लिनिकमध्ये सापडलेल्या चिठ्ठीत त्यांचे पती संदीप वाजे यांना दुसऱ्या लग्नाला संमती देण्याच्या मोबदल्यात ५० लाख रुपये पोटगी मागितल्याचे समोर आले आहे. त्यावरून दोघांमध्ये वाद होत असल्याचे तसेच संदीप वाजे हा डॉ. सुवर्णा यांना आत्महत्येला प्रवृत्त करण्याच्या हेतूने संवाद साधत असल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे पोलिसांनी डॉ. वाजे यांनी लिहिलेल्या चिठ्ठीवर व संदीपच्या मोबाइलमधील माहितीवर लक्ष केंद्रित केले आहे.
मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे यांचा खून त्यांचे पती संदीप वाजेने केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी संदीप विरोधात वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपासात संदीप व सुवर्णा यांचे नातलग आणि मित्रांची चौकशी केली. त्यात संदीपच्या मित्रांवर संशय असला, तरी पुराव्यांअभावी पोलिसांना कारवाई करण्यात अडचणी येत असल्याची चर्चा आहे. शुक्रवारी (दि. 11) संदीपच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांनी पुन्हा तपासास जोर लावला असून, डॉ. वाजे यांच्या चिठ्ठीसह, संदीपकडील मोबाइलचे संभाषण, त्यांच्या वाहनात सापडलेले हत्यार याबाबत चौकशी सुरू केली आहे.
दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज… नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. ? पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.