जळगाव : कार-कंटनेरच्या भीषण अपघातात दोन जागीच ठार | पुढारी

जळगाव : कार-कंटनेरच्या भीषण अपघातात दोन जागीच ठार

जळगाव,पुढारी वृत्‍तसेवा : एरंडोल शहरापासून हाकेच्या अंतरावरील ऑईल मिललगत राष्ट्रीय महामार्गावर कार आणि कंटेनर यांच्या झालेल्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले. तर इतर पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत माहिती अशी की, एरंडोल शहर पासूनजवळ असलेल्या ऑईल मिल जवळ कार (एमएच १९ सीव्ही ७७१७) आणि कंटेनर (एमएच ४६ बीबी ८५३२) यांच्यात झालेल्या भीषण अपघातात प्रकाशचंद राजमलजी बागरेचा रा. दुर्वाकुर पार्क, वाघुळदे नगर जळगाव यांच्यासह एक महिला कमलबाई जैन जागीच ठार झाले आहेत.  कार चालक नरेंद्र जैन, योगीता जैन, मुलगी लभोनी, मुलगा नमन व नातेवाईक विजय जैन हे जखमी झाले आहे. ही घटना शनिवार घडली आहे. जखमींपैकी दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जळगाव येथे हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच एरंडोल पोलीस तात्‍काळ घटनास्‍थळी पोहचले.

हे ही वाचलं का 

Back to top button