Nashik News | झोपलेल्या वृद्ध दाम्पत्यांसह चिमुकल्यावर घातली कार, शिवाजी नगर येथील घटना

नाशिक : अपघातग्रस्त वाहन
नाशिक : अपघातग्रस्त वाहन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मद्यसेवन करून भरधाव कार चालवत घराची सरंक्षक भींत तोडून अंगणात झोपलेल्या कुटूंबियांच्या अंगावर एकाने कार घातल्याची धक्कादायक घटना शिवाजी नगर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे घडली. या अपघातात अंगणात झोपलेल्या वृद्ध दाम्पत्यासह त्यांचा ६ वर्षीय नातू गंभीर जखमी झाला आहे.

हर्षदा अजय साेनवणे (रा. शिवाजीनगर) यांच्या फिर्यादीनुसार, व गंगापूर पोलिसांच्या माहितीनुसार, मंगळवारी (दि.४) मध्यरात्री एक वाजता हा अपघात झाला. संशयित चालक जगदिश खरमाडे हा एमएच १५ जेएस १७४१ क्रमांकाच्या इलेक्ट्रीक कारमधून जात होता. त्याचे कारवरील नियंत्रण सुटल्याने रेशमाई पार्क रो हाऊसच्या सरंक्षक भिंतीस धडक दिली. कारचा वेग जास्त असल्याने कार भींत फोडून आतमध्ये शिरली. त्यामुळे अंगणात झोपलेल्या सुरेश कृष्णा भदाणे, कलाबाई सुरेश भदाणे, पृथ्वी सुरज सुर्यवंशी (६) यांच्यासह हर्षदा सोनवणे व आणखी एका लहान मुलीच्या अंगावर गेली. त्यात सुरेश व कलाबाई यांच्यासह पृथ्वी यांना गंभीर दुखापत झाल्याचे पोलिसांनी सांगितले. तर कारचालक जगदिश हा देखील जखमी झाला आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी कारचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या रक्ताचे नमुने घेतले असून ते तपासणीसाठी पाठवले आहे.

गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

दरम्यान, गंगापूर पोलिस ठाण्यात संशयित जगदिश विरोधात सदोष मनुष्यवध करण्याचा प्रयत्न करणे, अपघात, नुकसान करणे आदी कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची माहिती मिळताच गंगापूरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी पथकासह घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच जगदिशवरील उपचार पुर्ण झाल्यानंतर त्याचा ताबा घेऊन चौकशी केली जाणार असल्याचे सोनवणे यांनी सांगितले.

हेही वाचा –

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news