पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजपला लोकसभा 2024च्या निवडणुकीत अपेक्षित यश मिळू शकलेले नाही, याचा ग्रहदशेशी काही संबंध असू शकेल का? NDAने बहुमत मिळवले आहे, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपला स्वबळावर बहुमत मिळवता आलेले नाही. त्यामुळे वृत्तवाहिन्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले एक्झिट पोलचे अंदाजाच्या पूर्ण उलट असा हा निकाल आहे. या बद्दल प्रसिद्ध ज्योतिषी चिराग दारूवाला यांनी मोदी पुन्हा पंतप्रधान होतील का यावर भाष्य केले आहे.
ज्योतिषशास्त्राचा विचार केला तर भाजपची जी घसरण झाली, ती आश्चर्यकारक नाही. नरेंद्र मोदी यांच्या कुंडलीतील ग्रहदशा लक्षात घेतली तर याची कारणं आपल्याला लक्षात येतील. मोदींची राशी वृश्चिक आहे. त्यांच्यावर ६ जूनपर्यंत मंगळची महादशा आणि शनीच्या अंतरदशा यांचा प्रभाव आहे. शनी हा वृश्चिक राशीसाठी घातक मानले जातो. तसेच हा शनी सिंहाच्या दहव्या स्थानी आहे. सिंहाचा राशीस्वामी सूर्य आणि शनी एकमेकांचे शत्रू मानले जातात. ही ग्रहांची स्थिती नरेंद्र मोदी यांच्यासाठी फारशी सकारात्मक आहे असे म्हणता येणार नाही.
बुध ग्रहाची दशा पाहिली असता त्यावर ५ जून २०२४पर्यंत अंतरदशा आहे, त्यामुळे नरेंद्र मोदी तिसऱ्या टर्मसाठी पंतप्रधान होतील. त्यांच्या कुंडलीत बुध हा आठव्या आणि आकराव्या स्थानांवर आहे, तसेच बुधाचे केतूशी संबंध चांगले मानले जात नाहीत. त्यामुळे या कालावधित त्यांना काही अनपेक्षित अडचणींना तोंड द्यावे लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्या टर्मसाठी पंतप्रधानपद भुषवतील, पण त्यांच्या मार्गात अनपेक्षित अडथळे ही येतील. असे ज्यातिषी दारुवाला यांनी सांगितले आहे.
गुरू ग्रहाने भारताच्या आधार कुंडलीत १ मे २०२४ला प्रवेश केला आहे, हे केंद्रातील सरकारसाठी फारसे सुसह्य नसेल. भारताच्या कुंडलीतील वृषभ राशीत राहू आहे, त्यामुळे गुरूची हे गोचर काही अनपेक्षित घटना घडवेल. तसेच केंद्र सरकारला काही चढउतारांना तोंडसुद्धा द्यावे लागेल. तसेच हा गुरू भारताच्या कुंडलीसाठी शुभ नाही. त्यामुळे नव्या सरकारला लवचिक आणि परिस्थितीला जुळवून घेण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. असे प्रसिद्ध ज्यातिषी चिराग दारुवाला यांनी ग्रहांची दशा बघुन सांगितले आहे.
हेही वाचा :