जळगाव, नरेंद्र पाटील – देशातील लोकसभा निवडणुक शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहचली आहे. राज्यातील पाचही टप्प्यांचे मतदान केव्हाच पार पडले आहे. आता प्रतीक्षा आहे 4 जूनची कारण चार तारखेला मतमोजणी होणार असून सर्व जागांचे निकाल लागणार आहे. त्यात जळगाव जिल्ह्यातील दोनही लोकसभा मतदारसंघाच्या निकालाची प्रतीक्षा ज्या-त्या पक्षातील कार्यकर्त्यांना लागली आहे. चार तारखेला कोणत्या पक्षाच्या कार्यालयासमोर विजयाचा गुलाल उधळला जातो. कुणाच्या कार्यालयासमोर ढोल-ताशांच्या निनाद, फटाक्यांची आतिषबाजी नेमकी कोणत्या पक्ष कार्यालयात होणार हे पाहण्याकडे सर्वाचे लक्ष वेधले आहे.
जीएम फाउंडेशनचे कार्यालय भाजपचे नवीन कार्यालय झाले आहे. राष्ट्रीय महामार्गावर शरद पवार गट व अजित पवार गट यांची कार्यालय आहेत. तर शिंदे गटाचे कार्यालय गावातच आहे. काँग्रेसचे कार्यालय तर ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणीच आहे. मात्र इतर पक्षांची कार्यालय शोधावी लागणार आहे. अशी ही आघाडी आणि युती यातील मुख्य कार्यालय शहरात आहे. मात्र कार्यकर्ते सर्व पक्षांची आहे.
निवडणुकीचे राज्यातील पाचही टप्पे पूर्ण झाले आहे. चार तारखेला सकाळपासून मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. युती असो की आघाडी सगळेच विजयाचा दावा करत आहेत. मात्र मतदारराजाने मतपेटीत कुणाला आशीर्वाद दिलाय हे 4 तारखेलाच कळणार आहे. मात्र या निवडणुकीमध्ये पक्षांची कार्यालय मात्र गजबजलेली दिसून येत आहे.
आजपर्यंत ज्या भाजपाने संघर्षातून इतिहास निर्माण केला ते वसंत स्मृती जळगावचे हक्काचे ठिकाण मात्र सध्या दुरावलेले दिसून येत आहे. सध्या भाजपाचे कार्यालय हे जीएम फाउंडेशनचे नवीन बांधण्यात आलेले भाजपाचे कार्यालय झालेले आहे. रस्त्यावर असल्याने सर्वांना सोयीचे असल्याने त्याच ठिकाणी भाजपाचा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा गराडा पडलेला दिसून येत आहे. यानंतर शिंदे सेना व उद्धवसेना दोघाही पक्षांचे कार्यालय गावात आहे. परंतु दोघेही दोन ठिकाणी आहे. जिल्हाध्यक्ष निलेश चौधरी यांनी निर्माण केलेलं जिल्हाध्यक्षांचे कार्यालय जरी आता सध्याला कारभार सुरू असणार मात्र शिवसेनेची अशी भक्कम इमारत जळगाव जिल्ह्यात कार्यालय म्हणून नाही तर उद्धव ठाकरेंची शिवसेनेची कार्यालय जरी जुने असले सतरा मंजिल इमारतीमध्ये जरी असले मात्र त्या ठिकाणी आजही तीच परिस्थिती आहे. उद्धव सेनेचा कारभार आजही हॉटेल मधूनच चालत आहे. त्यामुळे के पी प्राइड हे सध्याला उद्धव सेनेचे लोकसभेचे निवडणुकीचे कार्यालय झालेले आहे. काँग्रेसचे कार्यालयाची इमारत जरी शहराच्या मध्यवर्ती भागात असली तर जुनी असली तरी त्या ठिकाणी कार्यकर्त्यांची पाहिजे तशी भिड दिसून येत नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो की आज शरद पवार व अजित पवार या दोन नेत्यांमध्ये विभागला गेलेला आहे. हे दोन्ही नेत्यांची कार्यालय राष्ट्रीय महामार्ग आकाशवाणी चौक व दुसरे शिव कॉलनी चौक या ठिकाणीच आहे. दोन्हीही एका रस्त्यावर आहे. मात्र दोघींमध्ये खूप मोठे अंतर पडलेले आहे. युती व आघाडी मधील इतर पक्षांचे कार्यालय जरी पाहिजे तसे मोठे नसले तरी कार्यकर्त्यांची फौज जरूर आहे. त्यामुळे हे कार्यकर्ते येथे चार तारखेला आपला विजयाचा आनंद कोणत्या पक्ष कार्यालयात साजरा करणार याकडे सर्वांचे लक्ष वेधून लागलेले आहेत.
त्यामुळे फटाके नक्की कुठे फुटणार व कोणतं कार्यालय सजणार, राष्ट्रवादीत शरद पवारांची राष्ट्रवादी की अजित पवारांची राष्ट्रवादी, शिवसेनेत शिंदे सेना की उद्धव सेना नक्की कुणाच्या कार्यालयासमोर जल्लोष होणार? केपी प्राइड हॉटेल जरी असली तरी त्या ठिकाणी जल्लोष दिसेल का हे पाहावे लागणार आहे.
हेही वाचा –