Jalgaon Crime | 16 लाखांच्या दरोड्यातील संशयित पोलिसांच्या ताब्यात, एक अल्पवयीन

धानखरेदी गैरव्यवहार
धानखरेदी गैरव्यवहार

जळगाव पुढारी वृत्तसेवाचाळीसगाव: चाळीसगाव तालुक्यातील दैवत येथील घरामध्ये 12 मे रोजी रात्री घडलेल्या दरोड्यात सात अज्ञात दरोडेखोरांनी 16 लाख 63 हजार रुपयांचा सोन्या-चांदीचा मुद्देमाल लुटला होता. या प्रकरणी चाळीसगाव पोलिसांनी त्वरित कारवाई करत मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातून काही संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. यातील एक आरोपी अल्पवयीन आहे.

चाळीसगाव तालुक्यातील दहीवद या गावी घनश्याम धर्मराज पाटील (वय २९) यांच्या घरात दि. १२ मे रोजी रात्री ०२.३० ते ०३.०० वाजे च्या सुमारास घरात दडोरा टाकून गावठी कट्टयाचा धाक दाखवून लोखंडी व लाकडी दांड्याने फिर्यादीस मारहाण करून १६, लाख ७६, हजार रुपये किमंतीचा सोन्याचे दागिने व मोबाईल लुटून नेला.  या बाबत मेहुणबारे पोलीसस्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी एक पथक तयार केले होते. सपोनि संदीप परदेशी, पोउनि सुहास आव्हाड, राहुल सोनवणे, गोकुळ सोनवणे, दिपक पाटील, आशुतोष सोनवणे, रविंद्र बच्छे, राकेश महाजन, निलेश पाटील, विजय पाटील, नेम चाळीसगाव शहर पोस्टे, गोरख चकोर पोकॉ. ईश्वर पाटील, पोकॉ. गौरव पाटील यांनी मध्य प्रदेश मध्ये जावून स्थानिक पोलीसांच्या मदतीने बडवणी जिल्ह्यातील सेंधवा तालुक्यामधील भामपुरा गावातून संशयित आरोपी कालुसिंग हुजारीया बारेला वय-५२ , सुनिल मुरीलाल बारेला वय-२१ व एक अल्पवयीन संशयितास ताब्यात घेतले. त्याच्यांकडून १० लाख ९२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे १८२ ग्रॅम दागिने (१८ तोळे सोन्याचे दागिने) ५ लाख रुपये किमतीचे गुन्हयात वापरलेले चारचाकी बोलेरो पिकअप वाहन, २० हजाराची मोटरसायकल , ३ हजार किंमतीचा वापरता मोबाईल, हॅकसों ब्लेड (करर्वत) असा एकूण १६, लाख १५ हजार रुपये किमतीचा मुददेमाल ताब्यात घेतला. गुन्हयाचा पुढील तपास सपोनि संदीप परदेशी व पोकों. २२० निलेश लोहार व पथक करीत आहेत.

हेही वाचा –

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news