Jalgaon Lok Sabha | अखेर मुहूर्त ठरला ! महाविकास आघाडीचे 24 ला तर, महायुतीचे 25 ला शक्तीप्रदर्शन | पुढारी

Jalgaon Lok Sabha | अखेर मुहूर्त ठरला ! महाविकास आघाडीचे 24 ला तर, महायुतीचे 25 ला शक्तीप्रदर्शन

जळगाव : जळगाव व रावेर लोकसभा उमेदवारांचे नामनिर्देशन भरण्याचा मुहूर्त अखेर ठरला आहे. 24 तारखेला महाविकास आघाडीकडून श्रीराम पाटील व करण पवार हे नामनिर्देशन पत्र दाखल करणार आहे. तर 25 तारखेला भाजपच्या रक्षा खडसे व स्मिता वाघ आपले नामनिर्देशन दाखल करणार आहेत. दोनही दिवशी आघाडी व महायुतीकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे.

या शक्ती प्रदर्शनामधून आपल्याला किती मोठे समर्थन आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न आघाडी व महायुती करणार आहे. जिल्ह्यातील जळगाव लोकसभा व रावेर लोकसभा या दोन्ही मतदारसंघासाठी आघाडीचे उमेदवार 24 एप्रिल रोजी आपले नाम निर्देशन पत्र भरणार आहे. यासाठी ते कलेक्टर कार्यालयापर्यंत पायी शक्तिप्रदर्शन करणार असून त्यानंतर नामनिर्देशन पत्र भरणार आहे. यासाठी महाआघाडी कडून संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, आमदार शिरीष चौधरी हे उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे.

तर महायुतीकडून जळगाव व रावेर लोकसभेसाठी दोन्ही महिला उमेदवार दि. 25 रोजी आपले नाम निर्देशन पत्र भरणार आहेत. याची सुरुवात भाजपाच्या नवीन जिल्हा कार्यालयापासून म्हणजे जीएम फाउंडेशन च्या कार्यालयाकडून होणार आहे. यावेळी महायुती मधील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जळगावला उपस्थित राहणार आहे असे सांगण्यात आले आहे. याचबरोबर जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री व शिंदे गटाचे गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार जीवनराव पाटील व चंद्रकांत पाटील तर भाजपाचे नामदार गिरीश महाजन, आमदार राजू मामा भोळे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार संजय सावकारे ,अजित पवार गटाचे नामदार अनिल भाईदास पाटील व इतर पदाधिकारी आदी माजी आमदार खासदार उपस्थित राहणार आहे.

हेही वाचा –

Back to top button