Nashik accident | राजीवनगरला ट्रकखाली सापडून मुलाचा मृत्यू | पुढारी

Nashik accident | राजीवनगरला ट्रकखाली सापडून मुलाचा मृत्यू

इंदिरानगर: पुढारी वृत्तसेवा- राजीवनगर वसाहत येथे ट्रकच्या मागील चाकाखाली सापडून मुलाचा मृत्यू झाला, तर त्याचा साथीदार गंभीर जखमी झाला. इंदिरानगरमार्गे होणाऱ्या अवजड वाहनाच्या वाहतुकीचा प्रश्न या अपघातामुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. १९) रात्री लेखानगरकडून भरधाव वेगाने ट्रक (एमएच १६ क्यू ४२३७) कलानगरकडे जात होता. यावेळी दोन मित्र मोटारसायकलने जात होते. ट्रक व मोटारसायकल यांच्यात धडक होऊन समिहंत पत्की (१४, रा. इंदिरानगर) हा मुलगा ट्रकच्या मागील चाकाखाली सापडून त्याचा मृत्यू झाला, तर त्याचा साथीदार गंभीर जखमी झाला. अपघातानंतर स्थानिकांनी तत्काळ रुग्णवाहिका बोलावून जखमी तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, इंदिरानगरमार्गे होणारी अवजड वाहनांची वाहतूक बंद करावी, याबाबत अनेक वर्षांपासून मागणी आहे. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी अनेकदा कलानगर चौकात याबाबत आंदोलन छेडली आहेत. वेळोवेळी निवेदने देऊनही प्रशासनाकडून त्यास केराची टोपली दाखवली गेली.

हेही वाचा –

Back to top button