काँग्रेसने उभा केलेला देश भाजपने विकायला काढला : कुणाल पाटील यांचा आरोप | पुढारी

काँग्रेसने उभा केलेला देश भाजपने विकायला काढला : कुणाल पाटील यांचा आरोप

धुळे : पुढारी वृत्तसेवा- देशात महागाई, बेरोजगारी वाढली आहे, शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव नाही, त्यामुळे अराजकता वाढली आहे. काँग्रेस पक्षाने विविध उद्योग व्यवसायातून देश आणि देशातील प्रकल्प उभे केले. मात्र भाजपाने देश विकायला काढला आहे. त्यामुळे देशातील सत्तास्थानावरुन भाजपाला हटविण्यासाठी जनतेमध्ये प्रचंड उत्साह असून इंडिया आघाडीच्या उमेदवारांना लोकसभा निवडणूकतीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे आ. कुणाल पाटील यांनी सांगितले.

दरम्यान धुळे शहर माझी जन्मभूमी असून येथेच माझे प्राथमिक शिक्षण झाले आहे. धुळ्याची पालकमंत्री असतांना अनेक विकासाचे निर्णय घेतले त्यामुळे धुळे लोकसभा हीच माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे त्यामुळे आता आपल्याला शेतकरी, महिला, युवकांसाठी लढायचे असून जिंकायचेही असल्याचा विश्वास महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांनी धुळ्यात व्यक्त केला.

धुळे लोकसभा निवडणूकितील महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. शोभा दिनेश बच्छाव यांच्या प्रमुख उपस्थितीत आज आ. कुणाल पाटील यांच्या देवपूर धुळे संपर्क कार्यालयासमोरील सभागृहात महाविकास आघाडी व मित्र पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकिचे आयोजन करण्यात आले होते. बैठकिला काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील, उमेदवार डॉ. सौ. शोभाताई बच्छाव, माजी खा. बापू चौरे, माजी आ.प्रा.शरद पाटील, काँग्रेसच्या नेत्या प्रतिभाताई शिंदे, महाराष्ट्र काँग्रेसचे माजी आ. शरद आहेर, माजी आ.डी.एस. अहिरे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश मिस्त्री, हिलाल माळी, प्रथम महापौर भगवान करनकाळ, ज्येष्ठ नेते रमेश श्रीखंडे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष गुड्डू कक्कर, जमिल मन्सूरी, ज्येष्ठ पत्रकार हेमंत मदाणे, महेश घुगे, काँग्रेसचे प्रदेश सचिव युवराज करनकाळ, जोसेफ मलबारी, आम आदमी पक्षाचे अध्यक्ष हीतेंद्र पवार, सौ. शुभांगी पाटील, प्रा. जसपाल सिसोदिया, बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील, माजी सभापती गुलाबराव कोतेकर, साबीर खान, नाशिक काँग्रेस प्रभारी अध्यक्ष शिरीष कोतवाल, शिवसेना उबाठाचे डॉ. सुशिल महाजन, धिरज पाटील, हेमंत साळुंखे, गुलाब माळी, आदी उपस्थित होते.

बैठकित बोलतांना आ. कुणाल पाटील यांनी सांगितले कि, लोकसभा निवडणूकित काँग्रेस पक्षाने दिलेला जाहिरनामा हा सर्वोकृष्ठ जाहिरनामा आहे. देशाहिताचे अभिवचन त्यात काँग्रेस पक्षाच्यावतीने देण्यात आला आहे. काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांनी भाजपाला सडेतोड उत्तर देणे गरजेचे आहे. गेल्या सत्तर वर्षात काँग्रेस पक्षाने देशाला उभे केले, नवनवीन प्रकल्प आणून देशाची प्रगती केली. मात्र हेच प्रकल्प गहाण ठेवून भाजपा देश विकायला निघाला आहे. महागाई, बेरोजगारी वाढली असून शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमी भाव नाही. त्यामुळे शेतकरी दुःखी आहे.असे यावेळी आ. कुणाल पाटील यांनी शेवटी केले.

बैठकित बोलतांना उमेदवार डॉ. शोभाताई बच्छाव यांनी सांगितले कि, भाजपा आणि त्यांचे कार्यकर्ते खोटे बोलण्यात नेहमी पुढे असतात, मी बाहेरच्या जिल्ह्याची असल्याचे सांगुन सामान्य मतदारांची दिशाभूल करीत आहेत. धुळ्याची पालकमंत्री असतांना जिल्हयाच्या विकासासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. त्यामुळे मी खान्देशची कन्या असून धुळे लोकसभा हीच माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी असल्याचे डॉ. शोभाताई बच्छाव यांनी सांगितले.

लोकसभेत बेरोजगार, महिला आणि शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न माडणार आहे. आज कांदा पिकाला हमीभाव नाही, कापसाला भाव नाही, शेतकऱ्यांचा प्रत्येक शेतीमालाला भाव नाही त्यामुळे शेतकरी हैराण झाला आहे. केंद्रातील भाजपा सरकार हे शेतकरीविरोधी सरकार असून त्यांना त्यांची जागा दाखविण्याची हीच वेळ असल्याचे डॉ. शोभाताई बच्छाव यांनी सांगितले.

हेही  वाचा –

Back to top button