Jalgaon News | अपघातात दुचाकीस्वारासह वृध्दाचा मृत्यू, पोलीसांत गुन्हा दाखल | पुढारी

Jalgaon News | अपघातात दुचाकीस्वारासह वृध्दाचा मृत्यू, पोलीसांत गुन्हा दाखल

जळगाव- शहरापासून जवळ असलेल्या पुष्पा पेट्रोलपंपाजवळ भरधाव दुचाकीने पायी जाणाऱ्याला जोरदार धडक दिल्याने पायी जाणाऱ्या व दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी चौकशी अंती दि. १८ रोजी दुपारी ३ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावात राहणारा प्रणव प्रशांत कुदळे (वय २२) हा तरूण ३ एप्रिल रोजी रात्री ११ वाजेला काका राहूल वसंत कुदळे यांना रेल्वे स्टेशन येथे सोडण्यासाठी दुचाकी क्रमांक एमएच १९ डीडब्ल्यू ४६६७ वरून गेला होता. काका यांना रेल्वेस्टेशन सोडून परत घराकडे जात असतांना दि. ४ रोजी मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास पुष्पा पेट्रोलपंपाजवळ रोडवरून जात असतांना पायी जाणाऱ्या धमेंद्र राधेश्यामसिंग वय ४२ रा.केराकत उत्तरप्रदेश ह.मु. पोलीस कॉलनी, जळगाव यांना जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार प्रणव कुदळे आणि पायी जाणारा धमेंद्र राधेश्यामसिंह हे दोघे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी चौकशी अंती अखेर गुरूवार दि. १८ रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय पाटील हे करीत आहे.

हेही वाचा :

Back to top button