Sunny Leone : सनी लिओनी मल्याळम चित्रपटात, शूटिंग मुहूर्ताचा फोटो समोर | पुढारी

Sunny Leone : सनी लिओनी मल्याळम चित्रपटात, शूटिंग मुहूर्ताचा फोटो समोर

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री सनी लिओनी एका नवीन प्रोजेक्टसह मल्याळम फिल्म इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवण्यासाठी सज्ज झाली आहे. या चित्रपटाचे टायटल अद्याप समोर आलेले नाही. (Sunny Leone) तिने मल्याळम प्रकल्पाच्या शूटिंगला सुरुवात केली असून एका व्हिडिओमध्ये सनी टीमसोबत मुहूर्ताची पूजा करताना दिसली. या व्हिडिओमधून तिने नव्या प्रोजेक्ट्ससाठी सज्ज होताना दिसतेय. (Sunny Leone)

काही मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये सनी सध्या काम करताना दिसत असून आता ती मल्याळम चित्रपटाचा सुद्धा भाग होणार आहे. सनी लिओनीने यापूर्वी मामूतीच्या ‘मधुराजा’मध्ये एक भूमिका साकारली होती. तिने यापूर्वी ‘रंगीला’ आणि ‘शेरो’ या दोन मल्याळम चित्रपटांची घोषणा केली होती, जे अद्याप रिलीज झाली नाही. दरम्यान सनी लिओनी सध्या ‘स्प्लिट्सविला एक्स ५’ ची नवीन मालिका होस्ट करत आहे.

याशिवाय तिच्याकडे आधीपासूनच एक मनोरंजक चित्रपट येत आहेत. तिच्याकडे अनुराग कश्यपचा ‘केनेडी’ आहे, ज्याचा प्रीमियर कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये झाला होता आणि प्रतिष्ठित कार्यक्रमात तिला स्टँडिंग ओव्हेशन मिळाले होते. हा चित्रपट भारतात रिलीज व्हायचा आहे. याशिवाय सनी ‘कोटेशन गँग’मध्येही दिसणार आहे.

Back to top button