पुणे : ओतूरमध्ये व्यसनाधीन मुलाची आई वडिलांना मारहाण; पोलिसांची कारवाई | पुढारी

पुणे : ओतूरमध्ये व्यसनाधीन मुलाची आई वडिलांना मारहाण; पोलिसांची कारवाई

ओतूर; पुढारी वृत्तसेवा : व्यसनाधीन तरुणाने घर नावावर करून देत नाही म्हणून आईला व वडिलांना मारहाण करणाऱ्या मध्यमवयीन तरुणाला ओतूर पोलिसांनी अटक केली. सोपान बबन बनकर या संशयित आरोपीचे नाव आहे. कुऱ्हाडीने जबरी मारहाण केल्याची फिर्याद वडिलांनी दिली आहे.  याबाबतची माहिती ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांनी दिली.

सोपान बबन बनकर (वय ४२, रा.उदापूर,भोई आळी, ता.जुन्नर) हा मध्यमवयीन तरुणाला दारुचे व्यसन लागले होते. सहा महिन्यांपूर्वी घर नावावर करत नसलेच्या कारणावरून सोपान याने वडिलांना कुऱ्हाडीच्या तुंब्याने मारहाण केली होती. त्या घटनेची आठवण पुन्हा करून देत “तुला कुऱ्हाडीच्या तुंब्याने मारले होते विसरला का? व तू आज कसा वाचतो तेच बघतो” असे म्हणत सोमवारी( दि.१५) सकाळी आई वडिलांना मारहाण शिवीगाळ करीत कुऱ्हाडीचा डोक्यात वार केला. मात्र या हल्ल्यातून स्वत:चा बचाव करत वडिलांनी  घटना स्थळावरून पळून जात थेट ओतूर पोलीस ठाणे गाठले. पोलीस ठाण्यात हजर होऊन त्यांनी मुला विरुध्द तक्रार दाखल केली.

सोपान बबन बनकर (वय ४२, रा.उदापूर,भोई आळी, ता.जुन्नर) असे या दिवट्याचे नाव असून ओतूर पोलिसांनी त्याचेवर गु. र. नं. १४७/२०२४ भा. द. वि. क. ३०७ नुसार गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.या बाबत फिर्यादी वडील बबन विठ्ठल बनकर (वय ७६) रा. उदापूर यांनी तक्रार दाखल केली असून पुढील तपास स.पो. नि.एल.जी. थाटे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक ए. सी. केरुरकर हे करीत आहेत.

Back to top button