Crime News | १७ लाखांचे सोने घेवून बंगाली कारागीर फरार ! जळगावात खळबळ | पुढारी

Crime News | १७ लाखांचे सोने घेवून बंगाली कारागीर फरार ! जळगावात खळबळ

जळगाव- सोन्याचे दागिने बनवण्यासाठी बिस्कीट व सोन्याची लगड असे 256 ग्रॅम 17 लाख रुपये किमतीचे सोने बंगाली कारागिरी घेऊन फरार झाल्याची घटना जळगाव शहरात घडली आहे. ही घटना (दि. 28) मार्च रोजी उघडकीस आली. याप्रकरणी चौकशी अंती शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरात सोने व्यापाऱ्यांचा व्यवसाय असल्याने या ठिकाणी दागिने बनवण्यासाठी बंगाली कारागिरी आहेत. सोन्याचे व्यापारी शुभम प्रदीप वर्मा (वय ३०) रा. लक्ष्मी नगर, जळगाव आणि खेतेंद्र ओमप्रकाश शर्मा रा. जळगाव हे देखील बंगाली कारागीर यांच्याकडे सोन्याचे बिस्किट व तुकडे देऊन दागिने घडवितात. त्यांनी २७ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता बंगाली कारागीर शेख अमीरूल हुसेन (वय २८) रा. मंडूलीका बाजार, ता. जगत वल्लभपूर जि. हुगली राज्य पंश्चिम बंगाल ह.मु. जोशी पेठ याला १५ लाख रूपये किंमतीची २५४ ग्रॅम सोन्याची लगड आणि २ लाख रूपये किंमतीचे ३१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्कीट असे एकुण १७ लाखांचे सोने दानिगे बनविण्यासाठी दिले. बंगाली कारागीर अमीरूल हुसेन याने दिलेल्या सोन्याच्या लगड व बिस्कीट याचे दागिने न बनवता 17 लाखांचे सोने घेऊन पसार झाला. ही घटना दि. 28 रोजी उघडकीस आली. सोन्याचे व्यापारी शुभम वर्मा आणि खेतेंद्र शर्मा यांनी शनीपेठ पोलीसात धाव घेत बंगाली कारागीर शेख अमीरूल हुसेन याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उनिरीक्षक चंद्रकांत धनके हे करीत आहे.

  हेही वाचा –

Back to top button