Nashik Leopard News : चिंचखेडला उसाच्या शेतात आढळले बिबट्याचे तीन बछडे | पुढारी

Nashik Leopard News : चिंचखेडला उसाच्या शेतात आढळले बिबट्याचे तीन बछडे

जानोरी(जि.नाशिक) : पुढारी वृत्तसेवा – दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथे बिबट्याचा धुमाकूळ अनेक दिवसापासून सुरू आहे. सध्या या भागात ऊस तोडणी  सुरू असल्याने बिबट्याचे वारंवार दर्शन होत असते. आज सोमवार (दि. 18) मार्च रोजी सकाळी ऊसतोड करत असताना ऊसतोड कामगारांना बिबट्याचे तीन बछडे आढळून आले.

या परिसरातील अनेक पाळीव कुत्रे तसेच शेळ्या-मेंढ्या, गायींचे लहान वासरे यांच्यावर बिबट्या आणि त्यांची मादी हल्ला करत आहे. दरम्यान आज, शांताराम नथू पाटील यांच्या शेतात ऊसतोड सुरू असताना तीन बछडे आढळून आले. हे बछडे अंदाजे 15 ते 20 दिवसाचे असतील असे वन्यजीव रक्षक देविदास सताळे व किरण कांबळे यांनी सांगितले आहे. यासंदर्भात माहिती वन विभागाला देण्यात आली आहे. चिंचखेड येथील वन्यजीव रक्षक यांनी सध्या बछड्यांची देखभाल केली. या घटनेनंतर आता वन विभाग या परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावणार असल्याची माहिती वनविभाग दिंडोरी यांनी दिली.

बिबट्याचा वन विभागाने लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी वन विभाग कडे केली आहे.

 हेही वाचा –

Back to top button