Jalgaon Accident : शिवलिंग घेण्यासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, डंपरच्या धडकेत तीन ठार | पुढारी

Jalgaon Accident : शिवलिंग घेण्यासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, डंपरच्या धडकेत तीन ठार

जळगाव- शिवलिंग घेण्यासाठी निघालेल्या भाविकांच्या क्रूझरला भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत तीन भाविक ठार झाले तर चार जण जखमी झाले आहेत. आज सकाळी हा अपघात महामार्गावर बांभुरी जवळ घडला. काळाने क्रूर झडप घातल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

जळगावातील साईनगर भागात शिव मंदिर बांधण्यात आले असून, या मंदिरातील शिवलिंग घेण्यासाठी भाविक शुक्रवारी सकाळी सहा वाजता  क्रुझर गाडीने ओंकारेश्वरला निघाले होते. घरापासून निघाल्यावर अवघ्या चार किमी अंतरावर असलेल्या बांभोरीजवळ या भाविकांच्या गाडीला भरधाव वेगाने येणाऱ्या वाळूच्या डंपरने दिलेल्या जोरदार धडकेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना (दि. 15) रोजी (शुक्रवारी) सकाळी ७ वाजता घडली. बांभोरी गावाजवळ समोरून येणार्‍या डंपर ने क्रुझरला दिलेल्या जोरदार धडकेत, भीषण अपघात झाला. त्यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी आहेत.

या अपघातामध्ये मृत झालेल्यांमध्ये विजय चौधरी (४०), तुषार जाधव (२८) व भूषण खंबायत (३५, सर्व राहणार साई नगर, जळगाव ) यांचा समावेश आहे. तर चार जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.  मृतदेह जिल्हा रूग्णालात पाठविण्यात आले आहेत. पोलीस प्रशासनाचे आरटीओ विभाग एकमेकांकडे बोटे दाखवून या वर्धा वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी येत आहे. आजपर्यंत अनेकांचे जीव गेलेले आहेत मात्र प्रशासन अजूनही जागे होताना दिसून येत नाही.

हेही वाचा-

Back to top button