मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पूत्र अमित, स्नुषा मिताली ठाकरे यांच्यासमवेत पदाधिकाऱ्यांसोबत श्रीकाळारामाची आरती केली. (छाया : हेमंत घोरपडे.
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पूत्र अमित, स्नुषा मिताली ठाकरे यांच्यासमवेत पदाधिकाऱ्यांसोबत श्रीकाळारामाची आरती केली. (छाया : हेमंत घोरपडे.

Raj Thackeray Kalaram Temple | श्री काळाराम मंदिरात राज ठाकरेंच्या हस्ते आरती, कुटुंबीयांसह महापूजा

Published on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- वर्धापन दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे काल नाशिकमध्ये दाखल झाले. त्यांच्या हस्ते आज शुक्रवार (दि. ८) सकाळी १० वाजेच्या सुमारास येतील प्रसिद्ध श्रीकाळारामाची महाआरती करण्यात आली. यावेळी मुलगा अमित ठाकरे व स्नुषा मिताली ठाकरे यांच्यासह मनसेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. (Raj Thackeray Kalaram Temple)

मनसेचा १८ वर्धापनदिन शनिवारी (दि. ९) साजरा केला जाणार आहे. पक्षाच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच नाशिकमध्ये वर्धापन दिन होत आहे. त्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली असून त्यासाठी राज ठाकरे कालपासून नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान आज राज ठाकरे यांनी येथील प्रसिद्ध श्री काळारामाचे कुटुंबीयांसह दर्शन घेऊन पूजा-अर्चा केली. मंदिरात ठाकरे कुटुंबियांच्यावतीने महापूजा करताना गणपती पूजन, पुण्याहवाचन, अभिषेक करण्यात आला. त्यानंतर मंत्रपुष्पांजली म्हणण्यात आली. त्यानंतर अमित व मिताली ठाकरे यांनी मंदिराला प्रदक्षिणा मारली. यावेळी मंगेश पुजारी, श्रीकांत पुजारी, नरेश पुजारी यांनी पौरोहित्य केले. पूजेनंतर विश्वस्त धनंजय पुजारी, अ‍ॅड. अजय निकम, शुभम मंत्री, मंदार जानोरकर, दिलीप कैचे, मिलींद तारे, डॉ. एकनाथ कुलकर्णी यांनी ठाकरे परिवाराचा शाल व प्रतिमा देवून यथोचीत सत्कार केला. यावेळी मंदिराभोवती पोलिसांचा कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मंदिराच्या आतमध्ये तसेच पटांगणात ठराविक नागरिकांनाच प्रवेश देण्यात आला होता. (Raj Thackeray Kalaram Temple)

यावेळी लोकसभा संघटक अ‍ॅड. किशोर शिदे, गणेश सातपुते, प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, डॉ. प्रदीप पवार, अ‍ॅड. रतनकुमार इचम, सलीम शेख, पराग शिंत्रे, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, दिलीप दातीर, योगेश शेवरे, सुजाता डेरे, विभागीय अध्यक्ष सत्यम खंडाळे, भाऊसाहेब निमसे, बंटी लभडे, धीरज भोसले, साहेबराब खर्जूल, शाम गोहाड, विक्रम माळी, निखील सरपोतदार, निलेश सहाणे, विश्वास तांबे, मिलिंद कांबळे, अमोल भालेराव, अनंत सांगळे, नितीन आहिरराव, महिला अध्यक्ष आरती खिराडकर, पदमिनी वारे, ज्योती शिदे, गौरी सोनार, किरण शिरसागर, पंकज पाटेकर, अ‍ॅड. सागर कडभाने, प्रसाद सानप, संदीप भवर आदी उपस्थित होते.

उद्या वर्धापनदिन (Raj Thackeray Kalaram Temple)
मनसेचा १८ वर्धापनदिन शनिवारी (दि. ९) भाभा नगर येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात सकाळी ९ वाजेपासून विविध कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे. यावेळी पक्षप्रमुख राज ठाकरे प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेणार आहेत. तसेच दुपारी ११ वाजेच्यादरम्यान त्यांची सभा होणार असून, त्यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीबाबत ते पक्षाची भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे. या सभेसाठी राज्यभरातील पदाधिकारी नाशिकमध्ये दाखल झाले आहेत.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news